Search
Generic filters

पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का?

पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का?

पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का?

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 2 हजार नव्हे, तर तब्बल 5 हजार रुपयांचा हप्ता मिळणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

याशिवाय सोशल मीडियावरही याबाबतचे मेसेज व्हायरल होत आहेत. पण, खरंच असं होणार आहे का, यात नेमकं किती तथ्य आहे, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

2 हजार की 5 हजार?

PM Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण, गेल्या काही दिवसांपासून आता 2 नव्हे तर 5 हजार रुपये मिळणार, असे मेसेजेस व्हायरल होऊ लागले.

मग यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली.

pmkisan.gov.in या वेबसाईटवर या योजनेची माहिती सांगताना स्पष्ट म्हटलंय, “Under the scheme an income support of 6,000/- per year in three equal installments will be provided to all land holding farmer families.”

याचा अर्थ या योजनेअंतर्गत दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये इतकं आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना केलं जाणार आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ ‘या’ गोष्टींचे पालन करावे!

या वेबसाईटवर कुठेही 2 हजारां ऐवजी 5 हजार रुपये हप्ता देण्याबाबत उल्लेख करण्यात आलेला नाहीये.

दुसरं म्हणजे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले, “पीएम किसान योजनेअंतर्गत 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता दिला जाईल, असं काही आमच्या कानावर आलेलं नाहीये. उलट बँकांच्या आयएफसी कोड संदर्भातील काही बाबींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर याबाबत कार्यवाही करावी, असं आम्ही केंद्र सरकारला सांगितलं आहे.”

पीएम किसान योजनेशी संबंधित अडचणी दूर करण्याचं काम स्थानिक पातळीवर तलाठी कर्मचारी करत असतात.

अशाच काही तलाठी कर्मचाऱ्यांशीही आम्ही संपर्क साधला.

त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, “पीएम किसान योजनेअंतर्गत 2 हजार रुपयांऐवजी 5 हजार रुपयांचं हप्ता देण्यात येणार असल्याचे कोणतेही निर्देश शासनाकडून मिळालेले नाहीत.”

त्यामुळे मग पीएम किसान योजनेअंतर्गत आता आपल्याला 5 हजार रुपये हप्ता मिळेल, असा जो समज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो त्यांनी दूर करावा.

पुढचा हप्ता

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दहावा हप्ता डिसेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना मिळणार आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.पण, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या फोनवरून ऑनलाईन अर्ज करू शकता, तो कसा आणि या योजनेची सविस्तर माहिती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

source:- BBC News

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *