Search
Generic filters

पीएम किसान योजनेच्या लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले, तुमच्या खात्यात 2 हजार पोहोचले का?

पीएम किसान योजनेच्या

पीएम किसान योजनेच्या लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले, तुमच्या खात्यात 2 हजार पोहोचले का?

 

काही शेतकऱ्यांचं पेमेंट फेल झालंय म्हणजेच सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवलेत त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता मे महिन्यात जारी करण्यात आला होता. मात्र, पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. काही शेतकऱ्यांचं पेमेंट फेल झालंय म्हणजेच सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवलेत त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.

4 लाख शेतकऱ्यांचे पैसे लटकले  pm kisan yojana

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटनुसार देशातील 11 कोटी 97 लाख 49 हजार 455 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत 10 कोटी 25 लाख 79 हजार 415 शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून आठव्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे. मात्र, 4 लाख 45 हजार 287 शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. तर 6 लाख 84 हजार 912 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले होते मात्र त्यांच्या खात्यात ते जमा झालेले नाहीत. 30 जून 2021 पर्यंतची ही आकडेवारी आहे.

आंध्र प्रदेशच्या सर्वाधिक शेतकऱ्यांचे पैसे लटकले

पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात न पोहोचल्याची सर्वाधिक प्रकरण ही आंध्र प्रदेशातील आहेत. आंध्र प्रदेशातील 3 लाख 21 हजार 378 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील 87 हजार 466 तर महाराष्ट्रातील 23 हजार 605 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत.

पीएम किसान योजनेचं तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?

स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.
स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.

1 डिसेंबर 2018 पासून योजना लागू

पीएम किसान सन्मान योजनेची घोषणा 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. मात्र, पीएम किसान सन्मान योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी 16 लाख 5 हजार 539 शेतकऱ्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. आतापर्यंत योजनेअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये जारी करण्यात आलेल्या 7 व्या हप्त्याच्या रकमेमध्ये 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात आली होती. तर एप्रिल- जुलै 2021 दरम्यान केंद्र सरकारनं 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये पाठवले होते.

संदर्भ:- tv9 Marathi 

हे पण वाचा

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *