सौर कृषी पंप पीएम-कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कसा करायचा वाचा सविस्तर

सौर कृषी पंप पीएम-कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कसा करायचा वाचा सविस्तर

सौर कृषी पंप पीएम-कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कसा करायचा वाचा सविस्तर

शेती व्यवसयात प्रगती व्हावी तसेच शेतकऱ्याने केवळ निसर्गावर अवलंबून राहू नये याकरिता सरकारकडूही प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुशंगाने कुसुम सोलर पंप योजना ही राबवली जाणार आहे. निसर्गाचा लहरीपणा, वीजेची कमतरता शिवाय सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सहज शक्य होत नाही. परिणामी उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांवरील हेच संकट दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कुसुम योजना आणली आहे.

कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. तेव्हापासून 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचावी हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. कुसुम सोलर पंप योजना 2021 सुरु झाली असून या योजनेचा लाभ कसा घ्यावयाचा हे आपण आज जाणून घेणार आहोत..

कुसुम सौर कृषी पंप पात्रतेसाठी हे आहेत निकष

1) ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार हे पात्र असणार आहेत.
2) बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे.
3) ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
4) शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार हे सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC,5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

कुसुम सोलार पंप योजनेचे ही आहेत वैशिष्ट्य

1) महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देता येणार आहे. शिवाय शेतकऱ्यास स्वखर्चाने इतर उपकरनेही त्याला जोडता येणार आहेत.
2) सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा हा लाभार्थी याचा राहणार आहे.
3) शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

हे पण वाचा:- पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया

योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता

1) अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
2) सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
3) अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता च्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
4) सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.

ही आहेत आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) पासपोर्ट साईझ फोटो
3) रेशन कार्ड
4) नोंदणी प्रत
5) प्राधिकरण पत्र
6) जमीन प्रत
7) चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र
8) मोबाइल नंबर
9) बँक खाते विवरण

अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरवात

कुसुम सौर पंप योजना 2021 ला 14 सप्टेंबर पातून सुरवात झाली आहे. https://www.mahaurja.com/meda/en/node या लिंकवर क्लिक करुन इच्छुकास अर्ज करता येणार आहे.

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “सौर कृषी पंप पीएम-कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कसा करायचा वाचा सविस्तर”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *