Search
Generic filters

Kapus rate : देशांतर्गत कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता!

Kapus rate : देशांतर्गत कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता!

Kapus rate : देशांतर्गत कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता!

 

बोंड अळी व बोंडसडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात या वर्षी कापूस उत्पादकतेत घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीच्या ३५३ लाख गाठींवरून ही उत्पादकता दहा टक्के कमी होत ३२५ ते ३३० लाख गाठीपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता कापूस क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

देशांतर्गत २०१९-२० मध्ये १३४.७७ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड होती. कापसाच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने या वर्षी देशात सुमारे ३६५ लाख गाठींचे उत्पादन झाले. ४६० किलो रुई प्रतिहेक्‍टर अशी सरासरी उत्पादकता २०१९-२० मध्ये होती. २०२०-२१ मध्ये कापूस लागवड क्षेत्रात घट नोंदविण्यात आली. १३०.०७ लाख हेक्टरपर्यंत हे क्षेत्र मर्यादित झाले. या क्षेत्रातून ३५३ लाख गाठींची उत्पादकता मिळाली. सुरुवातीला ३७५ लाख गाठींची उत्पादकता होईल, असा अंदाज केंद्र सरकारच्या विविध संस्थांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र त्या वर्षीदेखील कापसावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. परिणामी, उत्पादकता घटत ती ४६२ किलो रुई प्रति हेक्टरपर्यंत खाली आली.

हे पण वाचा:- हमीभावाने तूर खरेदीसाठी ‘या’ तारखे पासून नोंदणी! 

या वर्षीदेखील कापूस उत्पादकता आणि वापरविषयक समितीने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापूस उत्पादकता वाढीचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी हंगामा अखेरीस ३५३ लाख गाठींची उत्पादकता असताना या वर्षी ती ३६२.१८ लाख गाठ राहील, असे समितीचे म्हणणे आहे. कापूस विषयाचे अभ्यासक मात्र समितीचा हा दावा खोडून काढतात. त्यांच्या मते देशात या वर्षी लागवड क्षेत्र कमी झाले असताना उत्पादकता वाढविषयक दावा धादांत खोटा आहे. या वर्षीच्या हंगामात ३२५ ते ३३० लाख गाठी इतकी मर्यादित उत्पादकता राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले. कापूस प्रक्रिया उद्योजकांच्या हितासाठी जास्त उत्पादकतेचा दावा केला जातो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी बाजारात आणि दर कोसळतात असा अनुभव आहे.

हे पण वाचा:- सहकार मंत्रालय काय आहे? राज्यात त्याचा काय परिणाम होईल?

या वर्षी मात्र देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा कापसाचे लागवड क्षेत्र घटले. महाराष्ट्राचे सरासरी लागवड क्षेत्र ४२ ते ४३ लाख हेक्टर आहे. मे आणि जून महिन्यांत सोयाबीनच्या दरात वाढ होऊन हे दर नऊ ते दहा हजार रुपयांवर पोहोचले. परिणामी, शेतकऱ्यांनी कापसाखालील क्षेत्र कमी करून सोयाबीन लागवड वाढविली. याच कारणामुळे कापसा खालील क्षेत्र महाराष्ट्रात अवघे ३९ लाख हेक्‍टरवर मर्यादित राहिले. लागवड क्षेत्र कमी झाले असतानाच सप्टेंबर महिन्यात पावसाची संततधार होती. त्यामुळे कापसाची वाढ खुंटली आणि बोंडसडचा प्रादुर्भाव झाला. पुढे बोंड अळीने पीक पोखरले या सर्वांचा उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. देशांतर्गत कापूस दरात तेजीमागे हे मोठे कारण सांगितले जात आहे. सध्या कापसाला ८५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. यापुढे दर नऊ ते दहा हजार पोहोचतील असा दावा केला जात आहे.

कापूस प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी शासनाच्या समित्यांवर आहेत. त्यामुळेच लागवड क्षेत्र कमी दाखवत उत्पादकता अधिक दर्शविली जाते. २०२०-२१ या वर्षीच्या हंगामात सुरुवातीला ३७५ लाख गाठींची उत्पादकता दर्शविण्यात आली होती. त्यानंतर हंगामा अखेर ती केवळ ३५३ लाख गाठ असल्याचे जाहीर करण्यात आले. या वर्षी लागवड क्षेत्र कमी असताना ३६२ लाख गाठींचे उत्पादन होईल, असे सांगितले जात आहे. ही उत्पादकता ३२५ ते ३३० लाख गाठी इतकीच राहील. बोंडसड व बोंड अळीमुळे उत्पादकता प्रभावित झाली आहे. परिणामी, कापसाचे दर हमीभाव ६०२५ वरून ८५०० रुपयांवर पोहोचले आहेत. येत्या काळात कापसाचे दर नऊ हजार ते दहा हजार रुपयांवर जातील.

– गोविंद वैराळे,कापूस विषयाचे अभ्यासक

source:- ऍग्रोवोन

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *