खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी ’14 मे’ रोजी जाहीर करणार ‘PM Kisan’ चा आठवा हप्ता, आपणही साधू शकता संवाद

prime-minister-narendra-modi-will-announce-the-eighth-installment-of-pm-kisan-on-may-14

खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी ’14 मे’ रोजी जाहीर करणार ‘PM Kisan’ चा आठवा हप्ता, आपणही साधू शकता संवाद

 

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला. निवडणूक व कोरोना साथीच्या आजारामुळे आठवा हप्ता येण्यास उशीर झाला. पण आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर ते पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पुढचा हफ्ता जाहीर करतील. मंगळवारी सकाळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांना यासंदर्भात एक मॅसेजही प्राप्त झाला आहे. मॅसेजमध्ये असे लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील आणि पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जाहीर करतील. या कार्यक्रममध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. तुम्हाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनापासून निमंत्रण आहे.

 

1 डिसेंबर 2018 पासून लागू आहे ही योजना

लोकसभा निवडणुका 2019 पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. तथापि, 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावी मानले गेले. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.

 

हे पण  वाचा :-कांदा’ भाव वाढणार ? माघील वर्षा पेक्षा शेतकऱ्यांना मोठा दिलासा- वाचा सविस्तर

2-2 हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये मिळतात

पंतप्रधान किसान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानंतर आतापर्यंत 10 कोटी 71 हजार 7 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत 8 कोटी 95 लाख 15 हजार 225 शेतकर्‍यांना पैसे मिळाले. त्याअंतर्गत, 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. जेणेकरून ते याचा उपयोग कृषी कामात करु शकतील.

 

पश्चिम बंगालमधील 10 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होणार

कृषी मंत्रालयाच्या नोव्हेंबर 2020 पर्यंत आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील 21.79 लाख शेतकर्‍यांनी पंतप्रधान किसान योजनेसाठी पोर्टलवर नोंदणी केली होती. पोर्टलवर 14 लाख 91 हजार शेतकर्‍यांचा डेटा अपलोड करण्यात आला असून त्यापैकी 9.84 लाख डेटा सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) साठी तयार आहेत. पीएफएमएससाठी डेटा तयार करणे म्हणजे या शेतकर्‍यांच्या खात्यावर 2-2 रुपये पाठविण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. या वेळी या शेतकऱ्यांना पैसे मिळतील असा विश्वास आहे.

संदर्भ :- tv9 marathi

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

2 thoughts on “खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी ’14 मे’ रोजी जाहीर करणार ‘PM Kisan’ चा आठवा हप्ता, आपणही साधू शकता संवाद”

  1. चंद्रकांत शिवमुतिया कलमेश्वरमठ (स्वामी)

    I AM WORKING ON MISSION ” SAVE THE MOTHER EARTH WITH FARMERS ” THROUGH ORGANIC FERTILIZER TO GUIDE FARMERS WHY TO USE AND HOW TO USE TO GET MORE QUANTITY AND QUALITY CROPS IN MINIMUM COST, CAN YOU JOIN WITH ME.? IF YES PLEASES CONTACT ME ON 09960293231.SANGLI MAHARASHTRA CHANDRAKANT SWAMI MADHAVNAGAR SANGLI. IF ANY FARMER WANT TO START BUSINESS IN ORGANIC FERTILIZER I WILL GUIDE THEM.

  2. Chandrakant Shivmurtiya Kalameshvrmath

    I AM WORKING ON MISSION ” SAVE THE MOTHER EARTH WITH FARMERS ” THROUGH ORGANIC FERTILIZER WHY TO USE AND HOW TO USE TO GET MORE QUANTITY AND QUALITY CROPS IN MINIMUM COST, CAN YOU JOIN WITH ME.? IF YES PLEASES CONTACT ME ON 09960293231.SANGLI MAHARASHTRA. IF ANY FARMER WANT TO START BUSINESS IN ORGANIC FERTILIZER I WILL GUIDE THEM.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व