पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी सरकार देतयं ७५ टक्के अनुदान, असा कर अर्ज

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी सरकार देतयं ७५ टक्के अनुदान, असा कर अर्ज

 

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सतत काही ना काही नवीन योजना राबवत असते. तसेच शेतकऱ्यांसाठी शेती करण्यासाठी आजही महत्वाची समस्या आहे ती म्हणजे सिंचनाची. यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत सरकार पाणी वाचवू शकेल अशा उपकरणासाठी आणि योजनांवर अनुदान देत आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांना ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणाली वापरण्यास प्रोत्साहित करीत आहे.

हे पण वाचा :-पुढील ४८ तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

सिंचन प्रणालीबरोबर शेती केल्याने ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. तर शेत पिकात सिंचनचा वापर केल्याने उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते. या योजनेसाठी शासनाने पुढील ५ वर्षांसाठी ५० हजार कोटी बजेटचे वाटप केले आहे.

पंतप्रधान सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दोन दिवसाचे ट्रेनिंग दिले जाते. कृषी कार्यशाळा याचे आयोजन करतात आणि शेतकऱ्यांना या संदर्भातील सर्व लहान मोठी माहिती देतात. सर्व शेतकरी पंतप्रधान सिंचन योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांजवळ स्वत:चा पाणीसाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान सिंचन योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही ७ वर्षानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ७ वर्षे जमीन घेतली आहे. शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम भरण्यास सक्षम असलेला शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर या योजनेसाठी केंद्र सरकार ७५ टक्के अनुदान देते.

हे पण वाचा :- PM किसान 2000 रुपयांचा हप्ता कधी पडेल जाणून घ्या

काय आहे ठिबक आणि स्प्रिंकलर

ठिबक सिंचनाच्या मदतीने कमी आणि लांब पिकामध्ये पाण्याची साठवण सहज करता येते. यामुळे केवळ पाण्याची बचत होत नाही तर उत्पादनातही भरघोस वाढ होते. त्याचबरोबर मुळा, गाजर, वटाणा, हिरव्या भाज्या, डाळी अशा अन्य पिकांमध्ये स्प्रिंकलर द्वारे (शिडकाव प्रणाली) सहज सिंचन करता येते.

 

असा करा अर्ज

पंतप्रधान सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व्यतिरिक्त शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा आणि बँक पासबुक छायाप्रत असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे पासपोर्ट साईज फोटोही आवश्यक आहे. शेतकरी http://upagriculture.com/pm_sichai_yojna.html  या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणाली बसविण्यासाठी शेतकरी नोंदणीकृत फार्म निवडण्यास मोकळा आहे.

https://www.santsahitya.in/

ref:- https://agrowonegram.com/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *