पंजाब डख हवामान अंदाज : पुढचे 3 दिवस पावसाचे, काढलेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची!

पंजाब डख हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज : पुढचे तीन दिवस पावसाचे, काढलेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची!

 

गेल्या सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामाला वेग आला होता. त्यामुळे सोयाबीन काढणी ही अंतिम टप्प्यात आहे तर तुरीचे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केलेले आहे.  पण आता काढणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे महत्वाचे कारण 16 ते 18 ऑक्टोंबर दरम्यान पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पीक काढणीपेक्षा त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक महत्वाची आहे. आता परतीच्या पावसाला सुरवात झाली असून या दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत..

पावसाने खरीप पीकांचे नुकसान तर केलेच आहे. पण आता काढणी झालेल्या धान्याला पावसाचा धोका निर्माण झाला आहे. शेतामध्ये पाणी साचले असताना शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली. मराठवाड्यात 10 ऑक्टोंबरपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतशिवारात केवळ सोयाबीन काढणीची कामे सुरु आहेत. मात्र, पावसाचे पाणी जागोजागी साचल्याने मळणीची कामे रखडलेली आहेत. आता सोयाबीनची काढणी झालेली असली तरी मळणीसाठी बनीम लावून ठेवण्यात आलेल्या आहेत. यातच पुढील तीन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे. शिवाय या पावसाचा परिणाम आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावयाची याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे.

वातावरणात बदल

हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी 16 ऑक्टोंबरपासून पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी याची चूणुक 15 ऑक्टोंबरपासूनच पाहवयास मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. गेल्या सहा दिवसांपासून आकाश निरभ्र होते मात्र, आज वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग आले आहेत. यापुर्वीच पावसामुळे खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण आता काढणी केलेल्या पीकालाही पावसाचा धोका निर्माण झाला आहे.

हे पण वाचा:- ‘या’ तारखेला जमा होणार पी.एम. किसान सन्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर!

सोयाबीनची काढणी झाली आता पुढे काय?

पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी सोयाबानची काढणी उरकली आहेत. सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचले असतानाही ही कामे उरकून एका ठिकाणी साठवणूक करण्यात आली आहे. पण आता शनिवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शिवाय काढणी झालेले सोयाबीन हे देखील पावसात भिजणार नाही याची दक्षता घेण्याचा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे.

बदलत्या वातारवरणाचा द्राक्ष बागांनाही धोका

पावसाबरोबरच वातावरणातही बदल होणार आहे. त्यामुळे केवळ खरीपातील पीकांनाच नाही तर फळबागांवरही या वातावरणाचा परिणाम होणार आहे. द्राक्षाचे पीक आता तोडणी अवस्ठेत आहे. मात्र, धुई, धुके यापासून धोका आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार यांनीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे. 11 ते 15 ऑक्टोंबर दरम्यान, थंडी व सुर्यदर्शन होणार आहे. त्यामुळे या वातावरणात सोयाबीनची काढणी-मळणी तर कापसाची वेचणीची कामे पार पडणे आवश्यक आहे. 16 ऑक्टोंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा धोका असल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा:- राज्य सरकारची अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज!

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा धोका

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र त्यांना लागूनच आकाशात चक्राकार वारे वाहत आहे. या कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान पूर्व पश्‍चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने दक्षिण, पूर्व आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *