Punjab dakh havaman andaj : राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस-गुलाब चक्रीवादळाचा फटका

Punjab dakh havaman andaj : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस-गुलाब चक्रीवादळाचा फटका

Punjab dakh havaman andaj : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस-गुलाब चक्रीवादळाचा फटका

महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चालु झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घ्यायचं ठरवलं नसुन येत्या 2 ते 3 दिवस मुसळधार ते अतीमुसळधार बरसण्याची शक्यता आहे.

24 सप्टेंबर पासुन होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुर सदृश्य परिस्थितीत पाहायला मिळत असुन बीडसह काही जिल्ह्यात मागील कित्येक वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे.

बंगालच्या उपसागरात घोंगावत असेलेले गुलाब चक्रीवादळ पुढे सरकले असुन यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे याचा उलट परिणाम म्हणुन राज्यात सर्वदुर मुसळधार पाऊस पडत आहे.

हे पण वाचा:- सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या महिन्यात’ लवकरच जमा करणार आणखी 2000 रुपये!

या पावसाचा जोर मराठवाड्यात अधिक असुन बीड,उस्मानाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद व जालन्या ला सर्वाधिक पाऊस पडत आहे.

तसेच या पावसाचा जोर संपुर्ण महाराष्ट्रात कायम असुन कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वारा आणि गडगाडीच्या पावसाने जोर धरला आहे.

हा पाऊस सप्टेंबर अखेर म्हणजेच दि. 30 सप्टेंबर पर्यंत राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर हळु हळू कमी होऊन 2 ऑक्टोबर पासुन संपुर्ण राज्यात सूर्यदर्शन होईल असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.

येणारे 2 ते 3 दिवस धोक्याचे असुन गरज असेल तरच घरा बाहेर पडा, शेतकऱ्यांनी कारण नसताना शेतात थांबु नये तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा व शेती अवजारांची काळजी घ्या.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *