पंजाब डख हवामान अंदाज : कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

पंजाब डख हवामान अंदाज : कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

पंजाब डख हवामान अंदाज : कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

11 ते 20 सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पंजाब डख यांची माहिती

गेल्या दहा दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या दहा दिवसाचा पाऊस हा कोकण व मराठवाड्यात मुसळधार झाला असुन उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार असुन येत्या दहा दिवसांत उत्तर महाराष्ट्रात धो धो पाऊस पडणार असल्याचे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक व नगर या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडु शकतो. हा पाऊस येत्या 18 तारखेपर्यंत बरसणार असून जनतेने सतर्क राहावे असे आव्हान पंजाब डख यांनी केले आहे.

राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काही दिवस ओसरण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे

नोट:- हा अंदाज असुन वाऱ्यात बदल झाल्यास हवामानाची परिस्थिती बदलु शकते.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *