१० एप्रिल पासून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

हवामान अंदाज

१० एप्रिल पासून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

 

मराठवाडा ते कोमोरिन परिसर आणि तमिळनाडू कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून मंगळवारपासून विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. आजही विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्यास हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपासून अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

हे वाचा:- केंद्रसरकार ‘या’ शेतकऱ्यांकडून २६१ कोटी करणार वसूल , कारण काय ?

तर तेलंगाणा ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तमिळनाडूच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. यामुले उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानात मोठी तफावत आढळून येत असून नागपूर येथे १९.३ अंश सेल्सिअसची सर्वात किमान नोंदविले गेले.

राज्यातील बहुतांश ठिकाणचा गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकला.

मध्य महाराष्ट्र 8 एप्रिल ढगाळ हवामान राहिल 10/11 एप्रिल पासून नाशिक धुळे जळगाव  अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर  मध्यम पाऊस पडेल 12/13/14 एप्रिल पासून बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस राहिल

विदर्भ  विदर्भाचा काही भागात पाऊस  9/10/11/12 /14एप्रिल पासून वादळी पाऊस गारपीट होईल
मराठवाडा 9/10एप्रिल मध्यम पाऊस आणि बीड परभणी जालना नांदेड लातूर उस्मानाबाद औरंगाबाद नांदेड हिंगोली या जिल्ह्यात  11/12/13/14एप्रिल पासून  जोरदार  अवकाळी पाऊस पडेल व गारपीट ची शक्यता आहे  १० एप्रिल पासून संपूर्ण  १० एप्रिल पासून संपूर्ण 
कोकण व  पश्चिम महा 
कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर या भागात ढगाळ हवामान होऊन किरकोळ पाऊस पुढील एक दोन दिवस राहिल /8/9/10हलका मध्यम पाऊस पडेल  11/12/13/14 एप्रिल ला जोरदार वादळी पाऊस राहिल

 

हे वाचा:- पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व