मराठवाडा, विदर्भ आणि ‘या’ ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता

मराठवाडा, विदर्भ आणि 'या' ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता

मराठवाडा, विदर्भ आणि ‘या’ ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता

 

दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रवाताची स्थिती आहे. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यासह तुरळक ठिकाणी गारपीट होत आहे.

 

पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रवाताची स्थिती आहे. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यासह तुरळक ठिकाणी गारपीट होत आहे. येत्या काही दिवस राज्यात उन्हाच्या चटका वाढणार असून, पाऊसही पडणार आहे. दोन ते तीन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होऊन विदर्भ व मराठवाड्यात पाऊस वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

विदर्भात आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. विदर्भातील सर्वच भागांत कमाल तापमान चाळिशीच्यावर आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे पारा चांगलाच वाढला आहे. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

सध्या विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू व कर्नाटक या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तमिळनाडूच्या दक्षिण भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच पूर्व मध्य प्रदेश व परिसरात व वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. याशिवाय सौराष्ट्र व कच्छ परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती असून मध्य प्रदेश व विदर्भ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस

शनिवार :-
संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ

रविवार :-
संपूर्ण महाराष्ट्र

सोमवार :-
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ

मंगळवार :-
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ

 

शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :-

 • मुंबई (सांताक्रूझ)- ३४
 • अलिबाग- ३३.१
 • रत्नागिरी- ३४.२
 • डहाणू- ३४.५
 • पुणे- ३८.६
 • जळगाव- ४२.२
 • कोल्हापूर- ३७.५
 • महाबळेश्‍वर- ३१.२
 • मालेगाव- ४०
 • नाशिक- ३८.९
 • सांगली- ३८.६
 • सातारा- ३७.१
 • सोलापूर- ४०.२
 • औरंगाबाद- ४०.६
 • परभणी- ४१.१
 • नांदेड- ४१.५
 • अकोला- ४२.९
 • अमरावती- ४१.६
 • बुलडाणा- ४१
 • ब्रह्मपुरी- ४४.६
 • चंद्रपूर- ४४
 • गोंदिया- ४१.८
 • नागपूर- ४३
 • वाशीम- ४०
 • वर्धा- ४३.२

संदर्भ :- www.agrowon.com

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व