Search
Generic filters

Rakta Chandan : रक्त चंदन म्हणजे नेमके काय ? काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर

Rakta Chandan : रक्त चंदन म्हणजे नेमके काय ? काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर

Rakta Chandan : रक्त चंदन म्हणजे नेमके काय ? काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर

 

रक्त चंदन म्हटले की बहुतेक जणांना चांदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते.सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन असमानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात.

रक्त चांदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते.

मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते.चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चांदनाप्रमाणे रक्त चांदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही.

रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो.रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खोड सरळ वाढत असून साल खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान संयुक्त पानाला बहुधा तीन एकाआड एक दले असतात. प्रत्येक दल ३-९ सेंमी. लांब असते. फुलोऱ्यात फुले थोडी असून ती पिवळी आणि लहान असतात.

निदलपुंज पाच, संयुक्त व हिरव्या दलांनी बनलेला असून दलपुंजात पाच मुक्त असमान गुलाबी पाकळ्या असतात. पुमंगात १० पुंकेसर असून त्यांपैकी नऊ संयुक्त व एक मुक्त असते. जायांग ऊर्ध्वस्थ असून त्यात एकच अंडपी असते. परागण कीटकांमार्फत होते. शेंग लहान, चपटी, गोलसर व पंखयुक्त असते. पिकल्यावर ती फुटते. बिया लहान व शेंदरी असतात.

रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही.

उपयोग

१) लाकूड सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात.
२) पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात.
३) रक्तचंदनाच्या लाकडापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्याचा उपयोग औषधांना रंग येण्यासाठी आणि लाकूड, रेशीम व चामडे रंगविण्यासाठी करतात.

४) खोडाच्या मध्यभागातील लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्ती, बुद्धिबळाच्या सोंगट्या व फर्निचर अशा विविध वस्तू तयार करतात.रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते

५) जरी या झाडाला सुंगध नसला तरीही या झाडाचे लाकूड मात्र फारच उपयोगी असते. किमती फर्निचर बविण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे या लाकडाला चीन, जपान, सिंगापूर देशात भरपूर मागणी असते.

हे झाड भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने आढळते. या झाडाला भरपूर मागणी असल्याने या झाडांची लागवड करून भरपूर नफा कमावण्यासाठीचा व्यवसाय वाढीस लागला आहे.

नुकतेच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात , पुसद तालुक्यातील पंजाबराव शिंदे यांच्या शेतातील रक्त चंदनाच्या झाडाची बातमी कळली. या पूर्वापार जपलेल्या झाडापासून त्यांना करोडो रुपयांचा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे.

धार्मिक कार्यात उपयोग

चंदनाच्या लकडाप्रमाणे याचे लाकूड होम हवन विधीमध्येदेखील करण्यात येतो.
● याच्या नैसर्गिक रंगाचा सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी देखील उपयोग केला जातो.
● रक्त चंदनाचे विविध फेसपॅक बाजारात उपलब्द्ध आहेत. याच्या वापराने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि उजळ बनते.

साधारण लाकूड पाण्यात तरंगते पण याच्या उलट रक्त चंदनाचे लाकूड जास्त घनतेमुळे पाण्यामध्ये टाकले असता अजिबात तरंगत नसल्याने हे लाकूड ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगितला जातो.ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात.

ओषधी उपयोग

१) रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते.
२) हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

मुकामार,शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन वापरतात.मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात.अशावेळी रक्तचंदन सहाणेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक द्यावा.

source:- dailyhunt

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *