Search
Generic filters

वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके वाचा सविस्तर !

वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके वाचा सविस्तर !

वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके वाचा सविस्तर !

 

krushi kranti :- तणनाशक herbicides  म्हणजे  उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन जे की पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जर तण येते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशक वापरले जाते. आज आपण कोणत्या पिकांसाठी कोणते तणनाशक व किती प्रमाणात वापरावे ते पाहणार आहोत.

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

१. टोमॅटो (Tomatoes) –

सामान्यतः टोमॅटो पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला जर तणांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर Targa Super & Sencor हे तणनाशक वापरावे जे की १-१.५ ml + १ gm डोस असावा. याच प्रमाणात तुम्ही कोबी या पिकाला सुद्धा हेच तणनाशक व डोस देऊ शकता.

२. सोयाबीन (Soybeans) –

सोयाबीन या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Iris हे तणनाशक वापरा ज्याचा डोस २ ml असावा, सोयाबीन पिकासाठी Iris हे तणनाशक खूप प्रभावी आहे.

३. मका (Maize) –

मका या पिकामध्ये तण रोखण्यासाठी तुम्ही Laudis + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ११५ ml + ५०० gm प्रति एकर असावे किंवा Tynger + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ३० ml + ५०० gm प्रति एकर असावा.

हे पण वाचा:- मका पिकासाठी खताचे नियोजन कसे करावे?

४. गहू (Wheat) –

गहू या पिकातील तण जाळण्यासाठी तुम्ही Algrip हे तणनाशक वापरावे ज्याच्या डोस चे प्रमाण ८ gm प्रति एकर असावे.

५. ऊस (sugarcane) –

उस या पिकामध्ये जास्त प्रमाणात तण उगवते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ D + Sencor + Atrazin हे तणनाशके वापरावे ज्याचे प्रमाण ५ ml + २ gm + ३ gm असावे.

६. कलिंगड, खरबूज, वांगी, मिरची, शिमला मिरची, काकडी, भेंडी, वाटाणा, शेपू , मेथी, कारले, दुधी भोपळा, दोडका, चवळी, फरशी, गवार, बिट या पिकांमधील तण जाळण्यासाठी तुम्ही Targa Super हे तणनाशक वापरा ज्याचा डोस १.५ ml ते २ml असावा.

. केळी, पपई, आंबा, सीताफळ, चिकू, पेरू या पिकातील तण रोखण्यासाठी Targa Super + Gramazone हे तणनाशक वापरावे ज्याचा डोस २ ml ते १० ml या प्रमाणात असावा.

संदर्भ:- कृषी जागरण

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.