Search
Generic filters

देशातून विक्रमी सोयापेंड निर्यात,भारतात सोया पेंड निर्मिती पोहोचणार 71 लाख टनांवर

देशातून विक्रमी सोयापेंड निर्यात,भारतात सोया पेंड निर्मिती पोहोचणार 71 लाख टनांवर

देशातून विक्रमी सोयापेंड निर्यात,भारतात सोया पेंड निर्मिती पोहोचणार 71 लाख टनांवर

 

आपण मागील काही दिवसांपूर्वी सोया पेंड आयाती वरून गाजलेले राजकारण आणि त्याचा सोयाबीनचे बाजार भाव वर झालेला परिणाम अनुभवला. तेव्हा अनुभव आला की जेव्हा सोयाबीन पेंड आयात केली जाते तेव्हा सोयाबीनचे बाजार भाव घसरतात आणि सोयापेंडची निर्यात झाली तर बाजार भावांमध्ये निश्चित सुधारणा होते. या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून त्यावर भर दिल्यामुळे बाजारभावात सुधारणा पाहायला मिळाली.

यावर्षीची सोयाबीन ची मार्केट परिस्थिती

जर मागच्या वर्षाचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर च्या हंगामात सोयाबीनची एकूण आवक 37 लाख टन होती.परंतु चालू वर्षी याच कालावधीत सोयाबीन आवक फक्त 29 लाख टनांवर राहिली.त्यामुळे सोयाबीनची आवक कमी होऊन त्याचे गाळप सुद्धा कमी झाले. बाजारपेठेत होणारी सोयाबीनची कमी आवक आणि गाळपक्षमता कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्‍यता आहे

असे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. चालू वर्षी नोव्हेंबर 2021 अखेर सोया पेंड निर्यात 58 हजार टनांनी  वाढून 2 लाख 70 हजार टनांवर पोहोचली आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनची आवक वाढतेय दर मात्र चिंताजनक, शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जवळजवळ अठरा लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. यावर्षीचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची आवक वाढेल, अशी खरेदीदारांना अपेक्षा होती मात्र नोव्हेंबर 2021 मध्ये सुद्धा केवळ 14 लाख टन  सोयाबीनचे आवक झाली. या तुलनेत मागच्या वर्षी चा विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 19 लाख टन सोयाबीन बाजारात दाखल झाले होते. याला प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली.

या वर्षी सोया पेंड निर्मिती होणार 71.83लाख टन ( सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन चा अंदाज )

चालू वर्षी देशात 90 लाख टन सोयाबीन गाळप होऊन त्यापासून 71.83लाख टन  सोयाबीन निर्मिती होईल असे सोपानेम्हटले आहे. आयात चार लाख टन  आणि मागील वर्षाची शिल्लक साठा 2.41 लाख टन गृहीत धरून  सोयाबीनचा एकूण पुरवठा 74.24लाख टनांचा होईल. त्यापैकी पोल्ट्री सह पशुखाद्यासाठी 58 लाख टन सोया पेंड वापरली जाईल

source:- कृषी जागरण

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *