Search
Generic filters

हमीभावाने तूर खरेदीसाठी ‘या’ तारखे पासून नोंदणी!

हमीभावाने तूर खरेदीसाठी 'या' तारखे पासून नोंदणी!

हमीभावाने तूर खरेदीसाठी ‘या’ तारखे पासून नोंदणी!

 

देशात ४ लाख २७ हजार टन आयात झाल्याने ऐन हंगामात तुरीचे दर दबावाखाली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्याने हमीभावाने तूरखरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. हमीभावाने तूर खरेदीसाठी सोमवारपासून नोंदणी सुरू होईल, अशी माहिती नॅशनल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे (नाफेड) अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले.

केंद्र सरकारने यंदा प्रक्रिया उद्योग आणि व्यापारी गटांच्या मागणीप्रमाणे तूर लागवडीच्या आधीच आयातीला परवानगी दिली. मात्र आयातीसाठी कोटा पद्धत बंद करून मुक्त आयातीचे धोरण राबविले. त्यामुळे आयातीसाठी दबाव गट निर्माण करणाऱ्यांना सरकारने धक्का दिला. मात्र देशात नोव्हेंबरपर्यंत २ लाख २७ हजार टन तूर आयात झाली. त्यामुळे देशात तूर आवकेचा हंगाम नसतानाही तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यातच सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत देशातील तूर उत्पादक पट्ट्याला अनेक वेळा पावसाने झोडपले. सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाला फटका बसला. अनेक भागांत उत्पादकता निम्म्यापर्यंत खाली आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

उत्पादनात घटीचा अंदाज

सरकारने यंदा देशात ४४ लाख ३० हजार टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला असला तरी उत्पादनात मोठी घट होईल, असे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांनी म्हटले आहे. व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांच्या मते देशात यंदा ३० ते ३४ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होईल.

हे पण वाचा:- अशी करा घरबसल्या ई-के वाय सी वाचा व पहा संपूर्ण माहिती

हमीभावाने तूर खरेदी आवश्यक

तूर उत्पादन घटण्याचा अंदाज असला तरी सध्या बाजारात आयात आणि नाफेडची तूर येत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत होऊन हंगाम सुरू नसतानाही दर हमीभावाच्या खूपच कमी आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन तुरीची आवक होत आहे. मात्र सध्या बाजारात येणाऱ्या मालात आर्द्रता अधिक आहे. खुल्या बाजारात तुरीला ५ हजार २०० ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांकडून हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्याची मागणी केली जात होती. आता सरकारने हमीभाव खरेदी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

या वर्षी प्रथमच डिसेंबर महिन्यात नोंदणी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत अधिकाधिक खरेदी करण्याचा मानस आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत खरेदी प्रकिया सुरू करण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रात नेमकी किती तूर खरेदी करणार हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. नाफेडच्या वतीने सध्या तरी २ लाख ७१ हजार टन खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कर्नाटकात २ लाख ५० हजार टन तूर खरेदी होण्याची शक्यता आहे.

काय म्हटले नाफेडने?

राज्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी सोमवारपासून नोंदणी सुरु होणार आहे, अशी माहिती नॅशनल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, अर्थात नाफेडचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले. सिंग यांच्या मते, देशात यंदा १०.८७ लाख टन तूर खरेदीची शक्यता आहे. त्यापैकी महाराष्ट्रात २ लाख ७१ टन तूर खरेदी होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

देशात यंदा १०.८७ लाख टन तूर खरेदीची शक्यता आहे. त्यापैकी महाराष्ट्रात २ लाख ७१ टन तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नोंदणीला सोमवारपासून सुरुवात होईल.

– एस. के. सिंग,

अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, नाफेड

source:- ऍग्रोवन

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *