‘या’ जिल्ह्यात रेशीम कोषच्या माध्यमातून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल!

'या' जिल्ह्यात रेशीम कोषच्या माध्यमातून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल!

‘या’ जिल्ह्यात रेशीम कोषच्या माध्यमातून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल!

 

गेल्या आठ दिवसांपासून येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदीला सुरवात करण्यात आली आहे. त्याअनुशंगाने जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही व्यापारी आता खरेदीसाठी बीडमध्ये दाखल होत आहे. दिवसाकाठी 6 ते 7 लाखाची उलाढाल होत आहे. बीड जिल्ह्यात  रेशीम कोषचे वाढते उत्पादन लक्षात घेता कोष खरेदीला परवानगी देण्यात आली होती. आता खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोय तर झाली आहे पण विक्रीसाठी बाहेत जिल्ह्यात जाण्यासाठी होत असलेला खर्चही टळलेला आहे. 6 नोव्हेंबरपासून या खरेदीला सुरवात झाली होती.

बीड जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळी भाग म्हणूनच आहे. पण काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होत आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यात रेशीम उद्योगाचे जाळे अधिक आहे. यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम विक्रीसाठी थेट जालना जवळ करावे लागत होते. पण आता जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे योग्य दरही मिळत आहे. 6 नोव्हेंबर रोजी माजी आ. जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित यांच्या उपस्थितीमध्ये या खरेदी केंद्राला सुरवात झाली होती.

आवश्यक कागदपत्रे

रेशीम उत्पादक शेतकरी संख्या ही कमी असल्याने यामध्ये काही अनियमितता होणार नाही. त्यामुळे सातबारा, 8 अ, आधार कार्ड हे घेऊन येण्याची आवश्यकता नाही तर केवळ पासबुक हे ऑनलाईन पेमेंटसाठी आवश्यक लागणार असल्याचे सचिव अशोक वाघिरे यांनी सांगितले.

हे पण वाचा:- राज्यात 14 ते 22 नोव्हेबंर दरम्यान ढगाळ वातावरणा सह तुरळक पावसाचा अंदाज

रेशीम उद्योगात वाढ

दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे मराठवाड्यात रेशीम उद्योग हे वाढत आहेत. बीड जिल्ह्यात जवळपास 3593 शेतकरी असून 3786 एकरांवर तुती लागवड आहे. गतवर्षी जिल्ह्यात 650 टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले, तर चालू वर्षी जवळपास 700 टन रेशीम कोष उत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यात किमान 5 ॲटोमॅटिक रेलिंग युनिट चालू शकतील, अशी जिल्ह्याची कोष उत्पादन क्षमता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जेवढे कोष उत्पादन होते तेवढे एकट्या बीड जिल्ह्यात होते. तर उत्तम दर्जाचे कोष जिल्ह्यात उत्पादित होत असल्याने रामनगरमच्या कोष बाजारात मागणी असते.

दरही चांगला

बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोष खरेदीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. दिवसाकाठी 12 ते 16 शेतकरी हे रेशीम कोष बाजारपेठेत घेऊन येतात. अगदी 2 किलोपासून ते 2 क्विंटलपर्यंत आवक होत आहे. रामनगर, बीड, सांगली आणि चंद्रपूर या ठिकाणाहूनही व्यापारी येत आहेत. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान रेशीम कोषची खरेदी ही सुरु असते.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *