Search
Generic filters

महत्वाची बातमी : राज्य सरकारचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मिळणार रस्ता, 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी

महत्वाची बातमी : राज्य सरकारचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मिळणार रस्ता, 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी

महत्वाची बातमी : राज्य सरकारचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मिळणार रस्ता, 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी

 

महाविकास आघाडी सरकारने  चार महिन्यापूर्वीच मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतरस्ते नसल्यामुळे  शेतीमालाची वाहतूक करणे मुश्किल होत आहे. शिवाय ऊसासारखे नगदी पीकही केवळ वाहतूकीमुळे घेता येत नाही. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. पण आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मान उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांना मिळाला आहे. शिवाय 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. शिवाय एमआरईजीएसच्या कुशल-अकुशल नियमांच्या कचाट्यातून पाणंद रस्त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 64 पाणंद रस्त्यांना मंजूरी

शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात पायी मार्गस्थ होणेही मुश्किल होत असत. शेतीमालाची वाहतूकही करता येत नसल्याने मोठे नुकसान होत असत. आता मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांसाठी मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शेकडो शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गा लागलेला आहे.

हे पण वाचा:- Fertilizer rate 2022 : खतांचे भाव वाढण्याचं कारण काय? सरकारनं खतांवर किती सबसिडी जाहीर केलीय? वाचा सविस्तर

अशी आहे मंजूर झालेल्या रस्त्यांची याद

उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये हे रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक रस्ते कळंब तालुक्यात 28 तर उमरगा 18, तुळजापूर 5, भूम 03, उस्मानाबाद 3 आणि लोहारा 4 व वाशी तालुक्यातील रस्त्यांची संख्या आहे 03 यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 64 रस्त्यांना मंजूरी मिळालेली आहे. जिल्हाधिकारी यांनी शेतरस्ते मोकळे करण्याची मोहीम राबवल्याने या योजनेला अधिक बळ मिळाले आहे.

1 किलोमीटरसाठी 24 लाख रुपये

आता पक्के शेतरस्तेच झाले नाहीत. एमआरईजीएस अंतर्गत एका किलोमीटरसाठी 5 लाख रुपयेही मिळत नव्हते. मात्र, या योजनेतून भरीव निधी आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे काम हे दर्जेदार होणार आहे. शिवाय उर्वरीत रस्ते उभारणीसाठी लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. 64 रस्त्यांची लांबी ही जवळपास 84 किमी राहणार असून याला मान्यता मिळाली आहे.

संदर्भ:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “महत्वाची बातमी : राज्य सरकारचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मिळणार रस्ता, 1 किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी”

  1. आम्ही जालनाकर आम्हाला रस्ता नाही आम्ही कोणाकडे शिकायत करू jalna Paregoan येथे jur काही उपाय असल तर मो.9764046900

Leave a Comment

Your email address will not be published.