पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सीड मदर राहीबाई पोपेरे, जाणून घेऊ त्यांच्या कार्याबद्दल माहिती !

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सीड मदर राहीबाई पोपेरे, जाणून घेऊ त्यांच्या कार्याबद्दल माहिती !

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सीड मदर राहीबाई पोपेरे, जाणून घेऊ त्यांच्या कार्याबद्दल माहिती !

 

राहीबाई या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी आहेत.तसेच त्या पारंपारिक बियाण्यांच्या वानांच्या संरक्षक संवर्धन देखील आहेत. भारत सरकारने त्यांना देशी वाणांच्या बियाण्यांची संवर्धन केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इसवी सन 2020 साली पद्मश्री पुरस्कार दिला होता.

राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सीड बँक मध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनी कडे उपलब्ध नाही. राहीबाई नि ज्या गावठी बियाण्याच्या संवर्धन केले आहे ते मूळ स्वरूपात आहे व त्याला आपले पूर्वज शेकडो वर्ष खात होते. राहीबाई यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी मिळून बचत गट बनवला आहे. या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.

अशी आहे राहीबाईंची सीड बँक

राहीबाई ची सीड बँक जेव्हा आपण पहायला जातो तेव्हा त्या उत्साहाने सगळ्या बियान्या बद्दल आपुलकीने माहिती देतात. आपण ज्या भाज्या बद्दल कधीही ऐकलं नाहीत या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपारिक पद्धतीने जतन करून ठेवले आहे.त्यांच्या मते आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहील असा त्यांचा आत्मविश्वास आहे.

गावामध्ये जवळ त्यांनी आजारी लोकांचे प्रमाण पाहिलं व निरीक्षण केलं की आधी बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. परंतु आताच्या बाळांचा जन्म होतो त्यांचे वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला. संकरित वानांमुळे तर आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होत नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ बांधली.त्यांच्या मते आज कालच्या भाज्या आणि पीक हे रासायनिक खतांवर येतात. परंतु देशी बियाणे मात्र नुसत्या हवेवर आणि पाण्यावर येऊ शकतो असे त्या सांगतात.

राही बाईंच्या सीड बँक मध्ये आज 52 पिकांचे 114 वाणआहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांमध्ये राहीबाई यांचा समावेश केलेला आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे.

BAIF संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कुंभाळणे गावात सीड बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतय. याचा परिणाम म्हणून अहमदनगरच्या अकोले तालुक्यासह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात.

राहीबाई पोपेरे यांना मिळालेले पुरस्कार

 देशी बियाण्यांच्या वाणांचे संवर्धन केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इसवी सन 2020साली पद्मश्री पुरस्कार दिला. हा पुरस्कार त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन 2018 मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारीशक्ती पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.

हे पण वाचा:- शेत जमिन खातेफोड म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर!

(संदर्भ-द फोकसइंडिया)

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *