Sheli palan yojana 2021 maharashtra : 50% अनुदानावर करा शेळीपालन

Sheli palan yojana 2021 maharashtra : 50% अनुदानावर करा शेळीपालन

Sheli palan yojana 2021 maharashtra : 50% अनुदानावर करा शेळीपालन

 

 

आजही केवळ शेती या मुख्य व्यवसयावर अवलंबून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. नैसर्गिक संकट, बाजापभाव यामुळे उत्पादनाबद्दल कायम शंका शेतकऱ्यांच्या मनात असते. त्यामुळे शेती या मुख्य व्यवसायाला जोडव्यवसाय असायलाच पाहिजे. मात्र, सुरवात कशाने करायची असे अनेक विचार शेतकऱ्यांच्या मनात येतात. परंतु,  शेळीपालन हा जोडव्यवसाय शेतकऱ्यांसाठी संयुक्तीक असून या व्यवसयाकरिता सरकारही पाठबळ देत आहे. सध्या बाजारात बोकडाचे दर आणि वाढणारी मागणी पाहता शेती व्यवसायाला हा जोड व्यवसाय दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढणारच आहे पण शेतकरी हा समृध्दही होणार आहे.  त्यामुळे राज्य सरकारडून याला कशा स्वरुपात अनुदान मिळते. त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती घेणार आहोत. अनुदान मिळवायचे असल्यास काय करायचे हे माहिती असणे आवश्यक आहे…

काळाच्या ओघात उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा कलही जोडव्यवसायाकडे वाढत आहे. शिवाय हा व्यवसाय शेती संबंधीच असल्याने यामध्ये काही अडचणी निर्माण होत नाहीत. शेतकऱ्यांसाठी ते सहज शक्य होत आहे. शिवाय तरुणांना देखील आपला एखादा व्यवसाय उभारण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याकरिता 50 टक्के अनुदानही मिळते. मात्र, त्यासाठी आवश्यक पध्दती माहीत असणे आवश्यक आहे.

शेळी पालन अनुदान योजना महाराष्ट्र 2021 अंतर्गत शासनाने मराठवाड्याच्या अनुशंगाने पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ गोंदिया, आणि सातारा तसेच दुसर्‍या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्हयांसाठी 20 शेळ्या आणि 2 बोकड म्हणजे शेळी पालन अनुदान योजना 2021 महाराष्ट्र साठी सरकार अनुदान उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून ही योजना राबवली जात आहे.

व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान

शेळी गटाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला 2 लाख 31 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेळ्यांसाठी बंदिस्त वाड्याची उभारणी करावी लागणार आहे. शिवाय याची उभारणी ही शेतकऱ्यास पदरुन करायची आहे. प्रत्येक प्रवर्गासाठा हीच अट असून याच्या 50 टक्के निधी हा शेळी वाड्याच्या उभारणीनंतर अनुदान स्वरुपात दिली जाणार आहे. मात्र, याकरिता सर्व प्रकल्प उभा करुन अनुदानाची प्रक्रीया करता येणार आहे.

हे पण वाचा:- कृषी कर्ज मित्र योजना ? शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज

20 शेळ्या, 2 बोकड योजना :

योजनेचे स्वरुप हे सरकारने ठरवून दिलेले आहे. या पध्दतीने शेळी आणि बोकडाची खरेदी केली तर हा व्यवसाय लहान स्वरुपात किंवा शेतकऱ्यांच्या क्षमतेनुसार सुरु करता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 20 शेळ्या 6 हजार रुपये किमतीच्या तर 2 बोकड हे 8 हजार रुपये किमतीचे खरेदी कराव्या लागणार आहेत. म्हणजे एकूण 1 लाख 36 हजाराची खरेदी करावी लागणार असून अनुदानस्वरुपात शेतकऱ्यांना 68000 हजार रुपये हे मिळणार आहेत. तर शेळ्यांच्या गोठा 450 चौ.फु बांधावा लागणार आहे. 212 चौ.फु यामप्रमाणे गोट्याला 95000 हजार रुपये खर्च येणार असून पैकी 47500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपाच मिळणार आहे.

शेती विषयक माहिती, बाजार भाव, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “Sheli palan yojana 2021 maharashtra : 50% अनुदानावर करा शेळीपालन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *