शेत जमिन खातेफोड म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर!

शेत जमिन खातेफोड म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर!

शेत जमिन खातेफोड म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर!

 

शेती  हा विषय आजही वादाच्या कळीचा मुद्दा आहे. शेती वरुन अनेक मतभेद पाहवयास मिळतात. एकत्र कुटुंबपध्दती जसा लोप पावत गेली अगदी त्याप्रमाणेच एकत्रित शेती करणेही आता काळाच्या ओघात कमी झाले आहे. एवढेच नाही तर शेतीच्या वादातून अनेक कुटुंब ही विभक्तही झाली आहेत.  असे असले तरी शेती कोणी कसायची आणि उत्पादनाची विभागणी कशी करायची हा प्रश्न कायम राहिलेला आहे. त्यामुळेच शेतजमिनीची खाते फोड करुन हा प्रश्न मार्गी लावला जाण्यावर अधिकचा भर राहिलेला आहे.

नेमकी खाते फोड म्हणजे काय आजही अनेकांना याची माहिती नसते. मात्र, अशा पध्दतीने शेताची विभागणी झाली तर भांडणाचे समुळ नष्ट होणार आहे. त्यामुळे आता खाते फोड ही केलीच जात आहे. शिवाय खाते फोड केल्यावर शासकीय योजना आणि अनुदानही सर्वाना समप्रमाणात मिळते त्यामुळेही खातेफोड केली जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी आहे कशी याची माहिती आपण घेणार आहोत.

काय आहे खातेफोड प्रक्रिया?

खातेफोड म्हणजे थोडक्यात जमिनीची विभागणी. महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 प्रमाणे जमिनीची खातेफोड केली जाते. त्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार ज्या कुटुंबाच्या जमिनीचे खातेफोड करायचे आहे, त्या कुटुंबातील सगळ्यांनी चर्चा करावी. अंतिम निर्णय कसा ठरला याबाबत सर्वांमध्ये कच्चा आराखडा तयार करावा. यामध्ये चतुर्सिमा दर्शवावी लागते.

खातेफोडसाठी सर्वांची सहमती अत्यावश्यक

खाते फोडसाठीच्या प्रक्रियेसाठी संबंधित गट नंबरमध्ये जेवढे जमीनधारक व त्यांचे अपत्य आहेत, त्या सगळ्यांची संमती असणे आवश्यक असते. ठरविल्याप्रमाणे जर खातेफोड करण्यास एकाची जरी संमती नसली तरी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याअगोदरच कुटुंबातील सर्वाची परवानगी घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:- सामुदायिक शेततळे योजना : असा करा अर्ज!

यानंतरच सारबारा उतारे वेगळे करता येतात

कुटुंबातील सर्व सदस्यांची परवानगी आहे हे ठरल्यानंतरच विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासोबत सातबारा उतारा, 8 अ, कुटुंबातील सर्वांची ओळखपत्र, शेत जमिनीची कागदपत्रे जोडून तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करावा लागतो. सदरचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो योग्यरीत्या तपासून तहसीलदार प्रत्येकाला नोटिशीद्वारे कळवून सुनावणीसाठी तारीख देतात. हे सुनावणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर तहसीलदार संबंधित तलाठी व मंडळ निरीक्षकांना आदेश देतात. त्याप्रमाणे नोंद करून ती मंजूर करून घ्यावी लागतात आणि नंतरच ठरल्याप्रमाणे सातबाराचे उतारे वेगळे होतात.

आवश्यक माहिती

हा फार्म एकूण दहा पाणी असतो. यामध्ये जमिनीचा तपशील, जमिनीचे क्षेत्र, घोषणा पत्र, तलाठ्याचा आदेश, सर्वांचे प्रतिज्ञापत्र, नोटिसा, जमीन वाटपासंबंधी तपशीलवार माहिती, अंतिम आदेश इत्यादी माहिती असते.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *