शेततळे अनुदानाचे 20 कोटी रु वितरित

शेततळे अनुदानाचे 20 कोटी रु वितरित

 

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत.

नगर: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत. मात्र कामे बंद होण्याअगोदर मंजुरी मिळाल्यानंतर कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान Farm subsidy देण्यासाठी शासनाने २० कोटींचा निधी वितरित केला आहे. पाच वर्षात राज्य शासनाने शेततळ्याची १ लाख १२ हजार ३११ कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत १ लाख ४९ हजार ५९० कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील अनेकांना कामे करूनही अनुदान मिळाले नाही.

 

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न घ्यावे यासाठी शासनाच्या कृषी विभागाने  Department of Agriculture सुरू केलेली ‘मागेल त्याला शेततळे’ योजना दुष्काळी भागासाठी अत्यंत लाभदायक ठरली असल्याचा अनुभव आहे. एका शेतकऱ्याला शासन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान देते. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने स्थगित केली आहे. मात्र त्याआधी मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश दिले. नंतर ती शेततळी शेतकरी शेतकऱ्यांनी पूर्ण केली. मात्र त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही.

 

२०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांत राज्यामध्ये अनुदानापोटी ६३६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यात आता वीस कोटीची भर पडली आहे. या वर्षी कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरून आलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना अनुदान व कंत्राटी कामगार मानधानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार २० कोटी नुकतेच प्राप्त झाले असून, ती रक्कम जिल्हास्तरावर वितरित केली आहे.

 

वितरित केलेल्या निधीत कोकण विभागाला २९ लाख ७७ हजार, नाशिक विभागाला ६७ लाख ५७ हजार, पुणे विभागाला ९ कोटी ९१ लाख, कोल्हापूर विभागाला २ कोटी ६१ लाख, औरंगाबाद विभागाला २ कोटी ७२ लाख, लातूर विभागाला ९९ लाख ५० हजार, अमरावती विभागाला ३३ लाख व नागपूर विभागाला २ कोटी ३० लाख रुपये वितरित केले आहेत.

गेल्या वर्षभरापासून शेततळ्याची कामे बंद असली तरी अजूनही अनेकांना अनुदान मिळाले नाही. राज्यात आतापर्यंत नगर जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ९ कामे पूर्ण झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात १४ हजार २९१, सोलापूर जिल्ह्यात १२ हजार ४७०, नाशिक जिल्ह्यात १० हजार ३८१ कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे अनुदानाचे शेततळे अनुदानाचे

हे वाचा:- वारस नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? वाचा सविस्तरपणे

राज्यातील शेततळ्याचीआतापर्यंतची स्थिती

एकूण उद्दिष्ट:

१ लाख १२ हजार ३११

प्राप्त अर्ज

४ लाख ५७ हजार ५२१

पात्र शेतकरी

४ लाख २ हजार ६४२

कामे पूर्ण झालेली शेततळे

१ लाख ४९ हजार ५९०

आतापर्यंत खर्च

६५६ कोटी (नुकतेच २० कोटी प्राप्त)

 

पाच वर्षांतील पूर्ण झालेली कामे

कोकण विभाग:-१८१७

नाशिक विभाग:- १३९३४

पुणे विभाग:- ३३८६७

कोल्‍हापुर विभाग:- ११२६५

औरंगाबाद विभाग:- ३३८०७

लातुर विभाग:-  १६३३७

अमरावती:- २२,७४७

नागपूर विभाग:- १५८१६.

संदर्भ:- ऍग्रोवन

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “शेततळे अनुदानाचे 20 कोटी रु वितरित”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व