Search
Generic filters

मागेल त्याला शेततळे योजने बाबत माहिती.

मागेल त्याला शेततळे योजने बाबत माहिती.

मागेल त्याला शेततळे –
 
राज्यात ८३ टक्के कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनांत शाश्वतता निर्माण करण्यासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे अत्यंत आवश्यक बाब आहे.खरीप हंगामात पर्जन्यामध्ये मोठा खंड पडल्यास शेतकऱ्याचे संपूर्ण पिक वाया जाते.त्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.खरीप हंगामात रब्बी हंगामात वाल, हरबरा, ज्वारी, गहू, या सारखे पीक घ्यावयाचे असल्यास त्यास एखादे दुसरे सिंचन उपलब्ध झाल्यास उप्तादकतेत मोठी वाढ करणे,पिकांना संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे यासाठी शेततळे अत्यंत उपयुक्त आहे.
 
 
योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष –
 

१.शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीतकमी ०.६० हेक्टर जमीन असावी.कमाल जमीन धारणेची  मर्यादा नाही.

२.शेतकऱ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील.जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे व पुनर्भरण करणे शक्य होईल.

.सदर शेतकऱ्याने या पूर्वी शेततळे,सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

.दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना  निवड प्रक्रियेमध्ये जेष्टता यादीत सूट देऊन आणि या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे    मागणी करणाऱ्यांची जेष्ठता यादीनुसार अर्थात प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे  सदर योजनेतर्गत निवड करण्यात येईल

.मागील ५ वर्षात किमान १ वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातील  लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील अशा गावातील यादी संबधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत  प्रसिध्द केली जाईल.

या योजनेतर्गत वरीलपैकी कोणतेही एका आकारमानाच्या शेततळ्याची शेतकऱ्यास मागणी करता येईल.यामध्ये जास्तीत जास्त 30X30X3 मी आकारमानाचे व कमीत कमी 15X15X3 मी (इनलेट,आउटलेट सह)तर 20X15X3 मी (इनलेट विरहीत)आकारमानाचे शेततळे घेता येईल.लाभार्थीची मागणी व शेत परिस्थिती नुसार शेततळ्याची लांबी रुंदी कमी जास्त करण्यास मुभा राहील आणि मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त येणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे.शेततळ्याच्या आकारमानानुसार देय अनुदान रक्कम भिन्न भिन्न असली तरी देय अनुदानाची कमाल रक्कम रु.५०,०००/- इतकी राहील.रु.५०,०००/- पेक्षा जास्त येणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे. योजनेतर्गत जास्तीत जास्त ५ शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरित्या समुदायिक शेततळे घेता येईल मात्र या शेततळ्याचे आकारमान अनुज्ञेय आकाराच्या प्रमाणात राहील.लाभार्थी शेतकऱ्यास स्वतः/ माजुराद्वारे /अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी /पोकलेन मशीन)सह्याने आपले शेततळे पूर्ण करता येईल.काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान सबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

egs.mahaonline.gov.in

स्रोत-आपले सरकार

Post Views: [views id="4026"]

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

3 thoughts on “मागेल त्याला शेततळे योजने बाबत माहिती.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *