Search
Generic filters

Soyabean Rate : सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, तरीही सोयाबीनच्या दरात घसरण, काय राहणार बाजारपेठेतील भवितव्य ?

Soyabean Rate : सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, तरीही सोयाबीनच्या दरात घसरण, काय राहणार बाजारपेठेतील भवितव्य ?

Soyabean Rate : सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, तरीही सोयाबीनच्या दरात घसरण, काय राहणार बाजारपेठेतील भवितव्य ?

 

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मनात काय त्याचप्रमाणे सोयाबीनच्या  दराबाबत झाले आहे. याशिवाय सोयापेंड आयातीबाबत केंद्र सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सोयाबीनच्या दरात वाढ होणार अशी अपेक्षा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर व्यापाऱ्यांनाही होती. मात्र, सध्या बाजारपेठेत भलतेच घडत आहे. सोयाबीनचे दर एकतर स्थिर आहेत किंवा त्यामध्ये घट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णयच केवळ महत्वाचा नाही तर मागणीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन आणि उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र या बाबीही महत्वाच्या आहेत. जागतिक बाजारपेठेत सोयाबीनचे उत्पादन आणि सध्या दरात होत असलेली घट यामुळे भविष्यातही सोयाबीन हे 7 हजारापेक्षा जास्त दरावर जाणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबींचा विचार करुन साठवलेल्या सोयाबीन बाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.

कमी आवक.. निर्यातीवरही परिणाम

वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवरच भर दिला होता. शिवाय देशातून सोयापेंडची निर्यातही थांबल्याने मागणीही घटलेली आहे. एकंदरीत बाजारपेठेत आवश्यकतेप्रमाणे सोयाबीनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे वाढीव मागणी होत नाही. याचाच परिणाम सध्याच्या दरावर होत आहे. गतआठवड्यात सोयाबीनचे दर हे एकतर स्थिर राहिले किंवा त्यामध्ये घटच झालेली आहे. आता स्थानिक पातळीच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे आवक वाढत आहे पण दर हे घटत असल्याचे चित्र आहे. अशा परस्थितीमध्ये सोयाबीनचे दर काय राहतील किंवा वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवणूक न करता टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीच केलेली फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ सांगत आहेत.

हे पण वाचा:- Kapus Rate : कापसाची झळाळी कायम राहणार!

बाजार समित्यांनिहाय सोयाबीनच्या दरात तफावत

गतआठवड्यात सोयाबीनच्या दरात वाढ तर झालीच नाही पण लातूरसारख्या महत्वाच्या बाजारसमितीमध्ये दर हे घटलेले होते. आतापर्यंत दराचा परिणाम हा सोयाबीन आयातवर झालेला नव्हता पण आता सलग दर घटत असल्याने सोयाबीनची आवक ही वाढलेली आहे. शेतकऱ्यांनाही कळून चुकलेले आहे की, सोयाबीनचे दर हे काही 7 हजारापेक्षा जास्त होणार नाहीत. त्यामुळे आवक ही वाढत आहे. तर बाजार समितीमध्ये होणाऱ्या आवकप्रमाणे दर हे राहिलेले आहेत. मात्र, दराबाबत चिंता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केलेलीच फायद्याचे राहणार आहे.

हे पण वाचा:- अखेर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरवात!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचाही परिणाम

सरकारने सोयापेंड आयातीला मुदतवाढ देण्यास नकार दिला तरी वापर तेवढाच होत आहे. यातच ब्राझील आणि अर्जेंटिना या देशात सोयाबीन पीक चांगले येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात तेजीची शक्यता गृहीत धरून व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन माल थांबविला आहे. मात्र, आता मागणी नियंत्रणात आल्याने त्याचे परिणाम गतआठड्यात बाजारपेठेत पाहवयास मिळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सोयाबीनच्या विक्रीबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *