Search
Generic filters

Soybean Rate : आवकमध्ये मात्र चढ-उतार शेतकऱ्यांची होतेय द्वीधा मनस्थिती

Soybean Rate : आवकमध्ये मात्र चढ-उतार शेतकऱ्यांची होतेय द्वीधा मनस्थिती

Soybean Rate : आवकमध्ये मात्र चढ-उतार शेतकऱ्यांची होतेय द्वीधा मनस्थिती

 

सोयाबीनच्या दराबाबत आता अंदाज मांडणे देखील मुश्किल झाले आहे. कारण एकीकडे दर घसरत असतानाच केंद्र सरकारने वायद्यांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे दरावर त्याचा विपरीतच परिणाम होणार आहे पण जर शेतकऱ्यांनी संयम बाळगून सोयाबीन बाजारपेठेत आणले तरच त्याचे दर हे टिकून राहणार आहे. गेल्या तीन आवड्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या आसपास आहेत. आता शेतकरी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करीत असताना दरात झालेल्या बदलामुळे नुकसान होत आहे. आवक कमी जास्त होत असली तरी दर मात्र, स्थिर असल्याने काय भूमिका घ्यावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

तीन आठवड्यात आवक पण दर….

खऱ्या अर्थाने दिवाळीनंतरच सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. ते ही योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री करायची नाही ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. दरम्यानच्या काळात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने 4 हजार 500 वरील दर थेट 6 हजार 600 पर्यंत गेले होते. मात्र, त्यानंतर सोयापेंड आयातीची चर्चा आणि आता केंद्र सरकारने वायदे विक्रीवर घातलेली बंदी यामुळे दरात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गेल्या तीन आठवड्यात 600 रुपयांची घसरण झाली आहे. शिवाय आता मार्केटमध्ये उठावच नसल्याने सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा मोठा प्रश्न आहे. बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11 हजार पोत्यांची आवक झाली आहे.

हे पण वाचा : e-kyc kashi karavi : अशी करा घरबसल्या ई-के वाय सी वाचा व पहा संपूर्ण माहिती

घटत्या दरामुळे सोयाबीन विक्रीवर भर

यापूर्वी सोयाबीनचे दर घटले तरी शेतकरी हे साठवणूकीवरच भर देत होते. कारण उत्पादन घटल्यामुळे दरात वाढ होणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता. पण आता केंद्र सरकारची धोरणे आणि भविष्यात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र ह्या चिंतेच्या बाबी आहेत. त्यामुळे मिळेल त्या दरात सोयाबीन विक्री केली जात आहे. मात्र, अचानक आवक वाढली तर आहे त्यापेक्षा दर कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला व्यापारी अशोक आग्रवाल यांनी दिला आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6275 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6191 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4850 रुपये क्विंटल, विजय चणा 4800, चना मिल 4700, सोयाबीन 6251, चमकी मूग 7200, मिल मूग 6000तर उडीदाचा दर 7125 एवढा राहिला होता.

हे पण वाचा : Soyabean and kapus Rate : सोयाबीनचे तेच कापसाचे, दराबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम? हा आहे मधला मार्ग

हमीभाव केंद्रावर नोंदणीला सुरवात

नाफेडच्यावतीने तुरी खरेदी केंद्र ही सुरु करण्यात आली आहेत. 1 जानेवारीपासून प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी खरेदी केंद्रावर नाव नोंदणीला सुरवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना हमी भावाचा अधार घ्यावयाचा आहे त्या शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी केले आहे. नाव नोंदणीनंतरच तुरीची खरेदी केली जाणार आहे. सध्या नाव नोंदणी केली जात असून कागदपत्रांची पूर्तता करुन नोंदणी करता येणार आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *