सोयाबीनचे भाव उडदाच्या बरोबरीने, दिवाळी नंतर तब्बल 2500 हजाराने दरात वाढ!

सोयाबीनचे भाव उडदाच्या बरोबरीने, दिवाळी नंतर तब्बल 2500 हजाराने दरात वाढ!

सोयाबीनचे भाव उडदाच्या बरोबरीने, दिवाळी नंतर तब्बल 2500 हजाराने दरात वाढ!

 

सोयाबीनच्या दर वाढीत सातत्य कायम राहिलेले आहे. दिवासाला 150 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ ही सुरुच आहे. दिवाळीनंतर सातत्याने वाढ झाल्याने आज सोयाबीनचे दर हे उडदाच्या बरोबरीने आले आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितमीमध्ये सोयाबीनला सौद्यामध्ये 7 हजाराचा दर मिळाला आहे तर पोटलीत सोयाबीनची खरेदी ही 6 हजार 450 रुपयांनी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उडीदाचे दर हे स्थिरच आहेत. मात्र, सोयाबीनच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे आज सोयाबीन हे उडदाच्या बरोबरीने आले आहे. दरामध्ये वाढ होत असली तरी मात्र, आवक अजूनही नियंत्रणातच आहे.

खरीप हंगामातील तूर वगळता सर्व पिकांची बाजारात आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला केवळ उडदाला चांगला दर होता आजही 7 हजार 300 रुपये दर टिकून आहे. पण उडदाच्या दरात पुन्हा वाढच झाली नाही. अखेर 4 हजार 500 वर असलेले सोयाबीन आज उडदाच्या बरोबरीने आले आहे.

सोयाबीनने पार केला 7 हजाराचा टप्प

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुरु झालेली वाढ अद्यापही कायम आहे. दिवसाला 150 ते 200 रुपयांची वाढ ही ठरलेलीच आहे. मंगळवारी लातूरमध्ये सोयाबीनला 7 हजार रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. यापूर्वी मुहूर्ताच्या सोयाबीनलाच असा दर मिळाला होता. मात्र, त्यानंतर सोयाबीनचे दर झपाट्याने घटले होते. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान झाले नाही तर आता दर वाढल्याने शेतकऱ्यांचा संयम कामी आला आहे.

हे पण वाचा:- कापूस दराला पुन्हा उभारी 

दर वाढत असतानाही आवक कमीच

सोयाबीनचे दर वाढत असतानाही आवक कमीच आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजाराचा दर असतानाही केवळ 13 हजार पोत्यांची आवक झाली आहे. दर वाढूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत. त्यामुळे दिवासाला 50 ते 60 हजार पोत्यांची आवक होणाऱ्या या बाजारपेठेत सध्या केवळ 10 ते 12 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. दिवाळीनंतर आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात केला जात होता. पण शेतकऱ्यांनी हा अंदाज फेल ठरवलेला आहे. आवक मर्यादित राहिल्याने सोयाबीनचे दर हे वाढत आहे. हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सोयाबीनचे आवक ही मर्यादित राहिलेली आहे.

हे पण वाचा:- पीएम किसान योजना : सरकारने बदलले नियम! ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत!

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5900 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5900 रुपये क्विंटल, जानकी चना 4902 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 7000, चमकी मूग 7250, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7300 एवढा राहिला होता.

source:- tv9

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *