Search
Generic filters

ड्रॅगन फ्रुट अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज , वाचा सविस्तर!

ड्रॅगन फ्रुट अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज , वाचा सविस्तर!

ड्रॅगन फ्रुट अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज , वाचा सविस्तर!

 

कृषी क्रांती :-  दिवसेंदिवस ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) ला भारतीय बाजारपेठेत (In the Indian market) मागणी वाढत आहे हि बाब ध्यानात घेऊन  महाराष्ट्र शासनाने अनुदान देण्याचा निर्णय (Grant by Government of Maharashtra) घेतला आहे.

मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ड्रॅगन फ्रुट यशस्वी लागवड केली जात आहे

त्याचबरोबर महाराष्ट्रातील (Maharashtra) ड्रॅगन फ्रुट चा दर्जा ही उत्कृष्ट असल्याने ते परदेशात निर्यात होत आहेत गेल्या काही वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात असून महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यातील शेतकरी याच्या लागवडीकडे वळले आहेत.

महाराष्ट्रातील कमी पावसाच्या क्षेत्रांत याची लागवड होत असून यामध्ये प्रामुख्याने सोलापूर (Solapur) जिल्हा पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर तालुका तसेच सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्याचा समावेश आहे.

या ठिकाणचे शेतकरी (Farmers) आता व्यापारी तत्त्वावर याची लागवड करत आहेत भविष्यात ड्रॅगन फ्रुट लागवडीला असणारी संधी आणि त्याची बाजारपेठ या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या वर्षीपासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या (Under the Integrated Horticulture Policy) माध्यमातून अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा:- “फळबागांसाठी कोणत्या शासनाच्या योजना आहेत?”

ड्रॅगन फ्रुट लागवड साहित्य आधार पद्धत ठिबक सिंचन (Drip irrigation) खते (Fertilizers) आणि पीक संरक्षण (Crop protection) या बाबी करता अनुदान देय आहे. यासाठी प्रति हेक्‍टरी चार लाख प्रकल्प खर्च गृहीत धरून 40 टक्के अर्थात एक लाख 60 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

हे अनुदान तीन वर्षात 60:२०:२० या प्रमाणात देय आहे. अनुदानाचा लाभ घेऊन ड्रॅगन फ्रुट लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल च्या महाडीबीटी mahadbtmahait.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

असा करा अर्ज 

 

यासाठी आपणास महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal).वर जाण्याची आवश्यकता आहे. किंवा खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून देखील तुम्ही जाऊ शकता.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

या ठिकाणी आपणास आपला युजर आयडी पासवर्ड (User ID Password) टाकायचा आहे, आपला युजर आयडी पासवर्ड नसेल तर तो तयार करणे आवश्यक आहे.

कॅपच्या कोड भरून आपणास लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठ दिसेल, त्याद्वारे राज्य सरकारचे योजना दिसतील, जसे की अवजारासाठी ज्या योजना आहेत त्या, ठिबक सिंचनाचे योजना, अशा विविध योजना दिसतील, यामध्ये तुम्हाला ‘फलोत्पादन'(‘Horticulture’) नावाचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला फलोत्पादन अर्जावरील संपूर्ण माहिती भरावी लागेल.

हा अर्ज भरत असताना, एकात्मिक फलोत्पादन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे, फळ निवडा अंतर्गत सीताफळ, जांभूळ असे विविध फळांचे ऑप्शन दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला ड्रॅगन फ्रुट नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

अर्ज भरून दिल्यानंतर मी अर्ज केलेले बाबींवर जाऊन छाननी अंतर्गत बाबींचा समावेश न झाल्याने ते दाखवत नाहीत. त्यासाठी पुन्हा तुम्हाला मुखपृष्ठावर जावे लागेल

व तुम्ही निवडलेल्या बाबीची पूर्तता करावी लागेल. तसेच योजने बाबीचा अटी-शर्ती मला मान्य आहे, या गोष्टीवर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.अशाप्रकारे ड्रॅगन फ्रुट या फळ लागवडीसाठी तुम्ही शासकीय अनुदान मिळू शकतात. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न मिळवू शकता.

हे पण वाचा:- सहकार क्षेत्र म्हणजे काय ? 

या कारणांमुळे वाढत आहे ड्रॅगन फ्रुट ची मागणी 

ड्रॅगन फ्रुट मध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे यामुळे मधुमेह संधिवात कर्करोग दमा इत्यादी आजार नियंत्रित होतात शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते चयापचय शक्ती वाढवते ड्रॅगन फ्रुट मध्ये जीवनसत्वे खनिजे आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असते विशेष म्हणजे हे फळ खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पांढ-या पेशींची संख्या वाढण्यास मदत होते

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *