ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान!

ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान!

आधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणे किंवा उपकरणे असणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले गेले आहे की जीथे शेतीसाठी मेहनत घेतली तेथे उत्पनात वाढ नक्की होते. धान्याची उत्पत्ती वाढत आहे. परंतू काही आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी महाग शेती अवजारे किंवा साधने खरेदी करण्यास असमर्थ असतात.ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी ९५ 

म्हणूनच या बातमीकडे लक्ष द्या, केंद्र सरकारने ४२००० कस्टम हायरिंग सेंटर स्थापित केले आहेत, खरं तर काही राज्यांमध्ये सरकारने कृषी यंत्र किंवा शेतीविषयक उपकरणे खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की कस्टम हायरिंग सेंटर उघडण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून एक रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी यांत्रिकीकरण (एसएमएएम) उप-मिशन नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नांगरणी, पेरणी, वृक्षारोपण, कापणी व कचरा व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी अवजारे आता सहज मिळतील. शेती सुलभ करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी पेरणी यंत्र, सारायंत्र नांगरणी यंत्र, रोटार यंत्र, मल्चर इत्यादी आधुनिक शेतीची उपकरणे दिली जातील.

ईशान्येकडील भागातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यात कस्टम हायरिंग सेंटर तयार करण्यासाठी १०० टक्के आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र १०० टक्के अनुदान असलेल्या या योजनेला जास्तीत जास्त १.२५ लाख रुपये मिळतील. म्हणून, जर ईशान्येकडील भागातील शेतकरी गटांनी मशीन बँक तयार करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत खर्च केला तर त्यांना ९५ टक्के अनुदान मिळेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी ९५ 

इतर भागात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४० टक्के मदत दिली जाईल. अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के दराने अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा सहज मिळू शकेल यासाठी सरकारने ‘सीएचसी-फार्म मशीनरी’ हे मोबाइल अॅप सुरू केले आहे. शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा सहज मिळू शकेल यासाठी सरकारने ‘सीएचसी-फार्म मशीनरी’ हे मोबाइल अॅप सुरू केले आहे. यामुळे सीएचसी-कृषी यंत्रणा कस्टम हायरिंग सेंटरद्वारे भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरसह सर्व प्रकारच्या कृषी यंत्रणा आपल्या क्षेत्रात सहज मिळू शकेल. सरकारने मोबाइल अ‍ॅपला सीएचसी फार्म मशीनरी असे नाव दिले आहे. हे अॅप गुगल, प्ले स्टोअरवर हिंदी, इंग्रजी, उर्दू यासह १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ref:- agrowonegram.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

8 thoughts on “ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान!”

    1. ट्रॅक्टर खरेदी कर्ने आ हे नवीन किटी टके अनुदान अहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *