अशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजी

अशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजी

अशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजी

 

जनावरांची हिवाळ्यात घ्यावयाची काळजी गेल्या आठवड्यापासून तापमानात अचानक घट झालेली आहे . रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा कडक ऊन अशी विषम परिस्थिती तयार झाली आहे . हा ऋतू आरोग्यदायक असला तरी लहान करने , कोकरे , वासरे यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे . त्याचबरोबर व्यायला आलेल्या जनावरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे . त्यासाठी छ जनावरांच्या गोठ्यांना बारदान किंवा शेडनेटचे पडदे लावावेत गोठ्यामधील उष्णता टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० वॉटचे बल्व गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावेत .

 

शक्य झाल्यास गे ठ्यामध्ये शेकोटी पेटवावी .गाभण जनावरांना व छोट्या जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत , कडवा , गोणपाट यांची बिछायत टाकावी . 8 गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी . त्यासाठी तर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा . थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे .

माती परीक्षणासाठीचा नमुना : वाचा संपूर्ण माहिती

 

विशेषत

गाभण गायी – म्हशींची जास्त काळजी घ्यावी . 8 जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावराच्या आहारात शेगदाणा पेंड , सरकी पेंड यांचा वापर वाढवावा . & शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा . क्षार व जीवनसत्त्वाचे मिश्रण वाढवावे . सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे , जाणेकरून गवतावर दहिवर नसेल , गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत . सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टरपेटाइनचा बोळा फिरवावा .

 

सर्दीचा रंग हिरवट – पिवळसर असल्यास तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ला घ्यावा . जनावराचे पिण्याचे पाणी अतिथंड नसावे जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत , 1 लाळ्या खुरकूत आजारापासून संरक्षणासाठी जनावरांना लसीकरण करावे .अशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजीअशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजीअशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजी

 

www.santsahitya.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *