Search
Generic filters

Kapus Rate : कापसाची झळाळी कायम राहणार!

Kapus Rate : कापसाची झळाळी कायम राहणार!

Kapus Rate : कापसाची झळाळी कायम राहणार!

 

देशातील बाजारांत पुढील काळात कापसाची आवक वाढेल, मात्र कापड उद्योगांची खेरदी वाढणार असून दर चांगले राहतील. भारतातील कापसाचे दर स्पर्धात्मक असून निर्यातीसाठी मागणी असून बांगलादेश सर्वांत मोठा आयातदार ठरला आहे.

देशातून सूत आणि कापड निर्यातही वाढत आहे. त्यातच देशांतर्गत कापूस वापरही वाढणार असून, कापसाच्या दराला आधार मिळेल, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मुंबई येथील फॉरेन अॅग्रिकरल्चरल सर्व्हिसेसच्या (एफएएस) मते देशात यंदा १२४ लाख हेक्टरवर यंदा कापूस पीक आहे. हे क्षेत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजापेक्षा तीन टक्के तर कापूस उत्पादन आणि वापर समितीच्या अंदाजापेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे.

दक्षिण भारतात होणारी रब्बी हंगामातील लागवड लक्षात घेऊन यूएसडीने लागवडीचा अंदाज आहे.

तर देशात यंदा कापूस उत्पादन २८० लाख खंडी (एक खंडी म्हणजेच ४८० पाउंड) म्हणजेच ३५९ लाख गाठी (एक कापूस गाठ म्हणजेच १७० किलो कापूस) होण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तर आणि मध्य भारतात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने कापूस वेचणीत व्यत्यय आला होता.

पावसाच्या शक्यतेने उत्तर भारतातील शेतकऱ्यांना कापसाची लवकर वेचणी करून कापूस सुरक्षित ठिकाणी साठविण्यास सांगितले आहे. मध्य आणि दक्षिण भारतात कापसाची वेचणी सुरू आहे.

येथील शेतकऱ्यांना पिकातील साचलेले पाणी शेताबाहेर काढण्याची सूचना केली आहे. तसेच गुलाबी बोंड अळी आणि किडीपासून पिकाचे संरक्षण करण्यास सांगितले आहे.

हे पण वाचा:- अखेर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरवात!

कापूसनिर्यात ७७ लाख गाठींवर पोहोचेल

एफएएसने यंदाच्या हंगामात देशातून ६२ लाख खंडी, म्हणजेच ७७ लाख गाठी कापूस निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली. कापूस आणि कापूस उत्पादनांच्या निर्यातीत ऊर्जेचा वाढता खर्च आणि कंटेनर्सची कमी उपलब्धतेमुळे अडथळे निर्माण होत आहेत. वाढत्या वाहतूक खर्चासह बंदरांवर कंटेनर्स खाली करण्यास विलंब होत असल्याने पुरवठा साखळी विस्कळित होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात कापूस निर्यात मागील वर्षीच काळातील निर्यातीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घटली आहे. मात्र शेजारच्या बांगलादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामधून मागणी वाढल्याने कापूस निर्यात ऑक्टोबरच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक बाजारात वाढलेले कापसाचे दर आणि फ्रेटच्या भाड्यात झालेली वाढ तसेच भारतीय कापसाचे स्पर्धात्मक दर यामुळे बांगलादेशातून भारतीय कापसाला मागणी वाढत आहे.

बांगलादेशी कापड उद्योग भारतीय कापसाला पसंती देत आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ५३ टक्के निर्यात बांगलादेशात झाली आहे. मागील वर्षी बांगलादेशला ४० टक्के निर्यात झाली होती. वाढती मागणी आणि स्पर्धात्मक दर असल्याने कापूस निर्यात अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे.

यंदा शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी एकापेक्षा जास्त कापूस वेचण्या घेण्याची शक्यता असून, पीक जास्त काळ शेतात राहण्याचाही अंदाज आहे. गुजरातमधील शंकर-६ या वाणाच्या कापसाचे दर ऑक्टोबरपासून ३१ टक्क्यांनी सुधारले आहेत. यंदा देशातील कापूस उत्पादकता ४९२ किलो प्रतिहेक्टरी राहण्याची शक्यता आहे.

लहान कापड उद्योगांची खरेदी वाढणार

सुताचे वाढलेले दर आणि आयात कापसावरील शुल्क यामुळे लहान कापड उद्योगांना मालासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे या उद्योगांनी डिसेंबरमध्ये कापूस आवक वाढत नाही तोपर्यंत प्रक्रिया बंद केली आहे.

त्यामुळे हे उद्योग प्रक्रियेत उतरल्यास दराला पुन्हा आधार मिळेल आणि वापरही वाढेल. तर मोठ्या कापड उद्योगांकडे २ ते ३ महिने पुरेल एवढा कापूस आहे त्यामुळे वाढत्या सूत दरामुळे हे उद्योग काळजीपूर्वक खरेदी करत आहेत. यंदा देशातील कापड उत्पादन ६८ टक्क्यांनी तर तयार कपड्यांचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढले आहे.

बाजारातील कापूस आवक घटली

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते देशातील बाजारात २५ नोव्हेंबरपर्यंत ४१.६ लाख खंडी, म्हणजेच ५३.३ लाख गाठी कापसाची आवक झाली आहे. बाजारातील एकूण आवक उत्पादन अंदाजाच्या १४.७ टक्के आहे. गेल्या हंगामात याच काळात २२ टक्के अधिक कापूस आवक झाली होती. हवामान सामान्य झाल्यानंतर वेचणी वाढून कापसाची आवकही बाजारात वाढण्याची शक्यता आहे. तर काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते देशातील कापूस उत्पादक ११ राज्यांत हमीभावापेक्षा अधिक दर आहेत.

कापूस वापर वाढणार

एफएएसच्या मते यंदा भारतात कापसाचा २६० लाख खंडी कापसाचा वापर होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच ३३३ गाठी कापूस वापर होईल. व्यापारी सूत्रांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी कायम असून, सूतगिरण्यांचीही क्षमता वाढल्याने कापसाला मागणीची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत काॅटलूक ए-इंडेक्समध्ये १४ टक्के तर ऑगस्टपासून २९ टक्के वाढ झाली.

सूत, कापड निर्यात वाढणार

सूत आणि कापडाला मागणी असल्याने या उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होणार आहे. वाणिज्य aमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांच्या निर्यातीत ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या उत्पादनांचे निर्यात मूल्य ७४ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच तयार कपड्यांची निर्यात ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढली आहे. एफएएसच्या मते देशात यंदा १० लाख खंडी म्हणजेच १२.८ लाख गाठी कापसाची आयात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियातून ४३ टक्के आणि अमेरिकेतून २५ टक्के कापूस आयात झाली.

source:– अग्रोवोन

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *