‘भारतीय हवामान खात्याचा अंदाज’ यंदाच्या मान्सूनमध्ये १०१ टक्के पाऊस पडणार, कुठे व किती पाऊस पडणार-वाचा सविस्तर

this-year-monsoon-will-receive-101-percent-rainfall

‘भारतीय हवामान खात्याचा अंदाज’ यंदाच्या मान्सूनमध्ये १०१ टक्के पाऊस पडणार, कुठे व किती पाऊस पडणार-वाचा सविस्तर

 

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज म्हणजेच  आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.

 

हे पण वाचा :-  सातबाऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

 

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

 

जून महिन्यातील पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागनं जून महिन्यात देशभरातील विविध भागांचा सर्वसाधारण अंदाज वर्तवला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहिल. उत्तर पूर्व भागात, दक्षिण भारतातील दख्खनचं पठार, उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

 

मान्सून 3 जूनला केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.

 

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संदर्भ :- tv9 marathi.com

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व