Search
Generic filters

टोमॅटो खत शेड्यूल व नियोजन

टोमॅटो खत शेड्यूल व नियोजन

टोमॅटो खत शेड्यूल व नियोजन

 

टोमॅटो शेड्यूल नियोजन (Tomato schedule planning) 

1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे। DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे।
2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे।
3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते।
4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये।
5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे। टोमॅटो फवारणी वेळापत्रक

6. तोडे चालू झाल्यास 00:52:34, पोटॅशियम सोनेट, 13:40:13,  आणि 00:00:50 आलटून पालटून वापरावे।
7. फुल धारणे पासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यायचा। कॅल्शियम ची कमतरता असल्यास फळाच्या बुडाला काळा डाग येत असतो।
8. कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यात बोरान नक्की देणे। तसा केल्यास कॅल्शियम अपटेक मध्ये पण मदत होते व फुलगळ पण थांबते।
9. मॅग्निशियंम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणा मध्ये पण वाढ होते।
10. दर 10 ते 15 दिवसांनी ह्युमिक ऍसिड किंवा मायकोरायझा ( रॅली गोल्ड किंवा इसबीएन किंवा VAM) सोडल्यास पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होते।
11. दर अमावस्येला 1 किलो प्रति एकर निमास्टीन + 1 किलो गूळ रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी ड्रीप मधून द्यावे, त्याने निमातोड वर चांगला नियंत्रण मिळते।

12. लागवडी च्या दुसऱ्या आठवड्या पासून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिल्लास आलटून पालटून दर आठवड्याला देत राहिला तर सर्व बुरशीं पासून चांगला सौंरक्षण मिळते व फवारणीचे खर्च पण मोठ्या प्रमाणात वाचतो। हे पद्धत अवलंबत असाल तर ड्रीप मधून बुरशीनाशक देणे टाळावे।
13. मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्ट दर 12 ते 15 दिवसांनी द्यावे
14. भुरी चे स्पोर जाळण्यासाठी M 45 व चांगल्या प्रति चे फॉस्फोरिक ऍसिड ची फवारणी घेतल्यास उत्तम नियंत्रण मिळेल असा तज्ज्ञांचा म्हणणं आहे।
15. लागवडीचे अंतर ज्यास्त ठेवल्यास हवा खेळती राहून करपा आणि अळी चा प्रादुर्भाव कमी होतो।
16. झाडात पोटॅश चा प्रमाण व्यवस्तीत असल्यास भुरी चा प्रादुर्भाव कमी होतो व लाल कोळी असल्या नियंत्रण सोपा जाते।
17. फुलगळ थांबवायचा असल्यास ड्रीप मधून स्फुरद द्यावे आणि फवारणी मध्ये चिलेटेडे कॅल्शियम व बोरान चा वापर करावा।
18. टोमॅटो मध्ये शेंडा खुडने (टॉपिंग) टाळावे। ते केल्यास व्हायरस वाढायची शक्यता ज्यास्त होते।
19. व्हायरस चे लक्षण दिसताच व्हायरस च्या औषध सोबत ताक वापरावे। ताकातील प्रोटीन व्हायरस सोबत मिक्स होऊन त्यांची उत्पत्ती नियंत्रनात येते।
Source:
व्यंकट पवार
नामधारी सीड्स, नाशिक
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *