Search
Generic filters

सोयाबीन, कापसा नंतर आता तुरीवर मदार!

सोयाबीन, कापसा नंतर आता तुरीवर मदार!

सोयाबीन, कापसा नंतर आता तुरीवर मदार!

खरीप हगांमातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. सध्या तुरीची आवक सुरु झाली असली तरी खरा हंगाम हा मार्चमध्येच सुरु होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु झाली असली तरी येथील हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळेल असाच अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. गेल्या महिन्याभरात दरात झालेली वाढ आणि सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचे घटलेले उत्पन्न यामुळे दरात वाढ होईल मात्र, शेतकऱ्यांना याकरिता काही वेळीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 6 हजार 300 चा हमीभाव ठरवून देण्यात आला आहे. परंतू, हे पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. मात्र, ऐन हंगामात तुरीची आवक कमी राहिली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे.

महाष्ट्रात सर्वाधिक लागवड क्षेत्र

तूर हे देशपातळीवर घेतले जाणारे पीक आहे. 44 लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी पैकी एकट्या महाराष्ट्रात 12 लाख 77 हजार हेक्टराव हे पीक घेतले जात आहे. वाढत्या क्षेत्राप्रमाणेच उत्पादनातही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण अखेरच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच पण ढगाळ वातारणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. हंगामात केवळ तूर पीकच जोमात होते पण अखेरच्या टप्प्यात या पिकाचीही अवस्था सोयाबीन अन् कापसाप्रमाणेच झाली.

हे पण वाचा:- नाबार्डचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांना कर्ज प्राप्तीचा मार्ग अधिक सुखकर!

सध्या काय आहे तुरीचे चित्र?

बहुतांश भागातील तुरीची काढणी कामे पूर्ण झाली आहे. अवकाळी पावसामुळे काढून टाकलेल्या पिकाचेही नुकसान झाले आहे. तर लातूर, अकोला, देगलूर, नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवकही सुरु झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी हे खरेदी केंद्राचा आधार घेत आहेत पण वातावरणातील बदलामुळे नव्या तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे 10 टक्के पेक्षा जास्त ओलावा असलेली तूर खरेदी केंद्रावर घेतली जात नाही. शेतकऱ्यांना कमी दरामध्ये व्यापाऱ्यांकडेच विक्री करावी लागत आहे. त्यामुळे सध्या 5 हजार 500 पासून ते 6 हजार 600 पर्यंत तुरीला दर मिळत आहे.

यामुळे दरात होणार वाढ

गेल्या 15 दिवसांपासूनच नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. या दरम्यानच्या काळातच 5 हजार ते 5 हजार 800 पर्यंतचे दर आता थेट 6 हजार 300 पर्यंत पोहचलेले आहेत. सध्या तुरीने हमी भावापर्यंत मजल मारली आहे. पण भविष्याचा विचार केला तर यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. शेतकऱ्यांनी जी सोयाबीन आणि कापसाबाबत भूमिका घेतली होती तीच तुरीबाबत घेतली तर दर निश्चित वाढणार आहेत. सध्या ढगाळ वातावरण असल्याने तूर वाळवण्यातही अडचणी येत आहेत. परंतू, तुरीची योग्य निघराणी आणि मागणीनुसार पुरवठा केला तर मात्र, दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व