केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय भारतातील शेतकऱ्यांना ‘यूनिक किसान आयडी’ क्रमांक मिळणार

unique-farmer-id

केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय भारतातील शेतकऱ्यांना ‘यूनिक किसान आयडी’ क्रमांक मिळणार

 

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्रालय शेती क्षेत्रामध्ये डिजीटलायझेशन चा प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नाअंतर्गतदेशभरातील शेतकऱ्यांचा केंद्रीभूत डाटाबेस तयार करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. या माहितीच्या आधारे शेती क्षेत्रामध्ये डिजीटल सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या डाटाबेसला देशातील शेतकऱ्यांच्या जमिनीचया रेकॉर्ड सोबत जोडले जाईल. यानंतर शेतकऱ्यांना एक यूनिक किसान आयडी दिला जाईल. शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध सरकारी योजनांचा माहिती यामध्ये नोंदवली जाईल.याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात मध्ये होऊ शकतो. शेतकऱ्यां बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी देखील त्याचा सरकारला उपयोग होईल.

 

पाच कोटी शेतकऱ्यांचा डाटा तयार

केंद्र सरकारच्या या उपक्रमांमध्ये आत्तापर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार झाला आहे. पुढील काळात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार केला जाईल अशी अपेक्षा आहे. पी एम किसान सन्मान योजना, सॉईल हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री पिक विमा योजना या संबंधित असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे डाटा एकत्रित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय, रासायनिक खते मंत्रालयं, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि इतर मंत्रालयाकडून माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

हे पण वाचा :- केरळ मध्ये मॉन्सून आज दाखल होणार, तर महाराष्ट्रात ‘या’तारखेला येणार

 

शेतकऱ्यांना काय फायदा

या डाटाबेसच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची, कोणत्या प्रकारचे बी बियाणे वापरायचं कधी लागवड करावी, त्याची कापणी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. शेतीसंबंधी विविध विकास योजना सुरु करण्याबाबत सरकारला या डाटाबेसची मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवायचा आहे किंवा विकायचा आहे, कुठे कोणत्या किमतीला विक्री करायची आहे या संबंधी माहिती या डाटाबेसच्या आधारे उपलब्ध होऊ शकते.

 

केंद्रीय कृषिमंत्री काय म्हणाले

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी देण्याचं कारण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगती करणं, शेतकऱ्यांचे जीवन चांगलं करण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढवणे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं सांगितलं. शेती क्षेत्रात नव्या डिजीटल पद्धतींचा वापर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. कठीण परिस्थितीमध्ये लढून संकटावर विजय करण्याची ताकद ग्रामीण भागातील शेतकरी आणि लोकांमध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी देणार आहे.

संदर्भ :- tv9 marathi.com

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *