वाटाणा लागवड माहिती

वाटाणा लागवड माहिती

वाटाणा लागवड माहिती

 

राज्यात वाटाणा पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी तापमान १o° ते १८° से तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. कडाक्याची थंडी व धुके यांमुळे पिकावर दुष्परिणाम होतो. फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगांत बी भरत नसल्याने वाटाण्याची प्रत कमी होते. त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी.

 

जमीन व पूर्वमशागत

वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निच-याची ५.५ ते ६.७ सामू असलेली जमीन निवडावी. वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले, तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते. हे पीक चांगले उत्पादनशील पीक असल्याने त्यासाठी पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी २५ गाड्या शेणखत व पाणी द्यावे व वाफसा झाल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते.

हे पण वाचा:- ताटी पद्धतीने करा वालाची लागवड आणि मिळवा नफा

लागवडीचा हंगाम

वाटाणा पिकाची वर्षातून दोन हंगामांत लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तसेच हिवाळ्यात ठरते. वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच घ्यावे. वाटाणा हे पीक वांगी, कांदा, टोमॅटो,बटाटा, कांदा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणा-या पिकांनंतर घेऊ नये.

 

वाटाण्याचे प्रकार व सुधारित जाती

अ) बागायती किंवा भाजीचा वाटाणा (गार्डन पी)

ब) जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा (फिल्ड पी)

 

सुधारित जाती

  1. अरकेल : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे ६ ते ७ सेंमी. लांबीच्या असतात. झाडांची उंची ३५ ते ४५ सेंमी. असून ५० ते ५५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
  2. बोनव्हेला : शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
  3. जवाहर – १ : शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ६ सेंमी. पर्यंत. लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरवात होते.

हे पण वाचा:- लसूण लागवड आणि काळजी

लागवडीचे अंतर व बियाणे

वाटाणा लागवड करताना सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये ३0 × १५ सेंमी. अंतरावर करावी. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी ४० किलो प्रति हेक्टर आणि पेरणी पद्धतीसाठी ८o किलो प्रति हेक्टर बियाणे लागते. बीजप्रक्रिया व रासायनिक खते : पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो ३ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे मुळकुजव्या हा रोग टाळता येईल. त्याचप्रमाणे पेरणीपूर्वी रायझोबियमची प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते. पिकास जमिनीचा मगदूर पाहुनच खताची शिफारस केली जाते. त्यासाठी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत १५:६o:६० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश देणे जरुरीचे आहे. जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसरून मिसळणे जरुरीचे असते. त्याचबरोबर संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र, बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे. त्यातून राहिलेले नत्र ज्या वेळी पीक फुलावर येईल त्या वेळी द्यावे.

 

किड व रोगांचे नियंत्रण

  1. मावा : या किडीच्या नियंत्रणासाठी मिथाईल डीमेटोन १o मिलि. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मिलेि. १o लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
  2. शेंगा पोखरणारी अळी : या किडीचे वेळेवर नियंत्रण न आणल्यास खूप नुकसान होते. यासाठी मेल्याथिऑन ५० ईसी, किंवा डेलटामेश्रीन ५ मिलि. किंवा एच.एन.पी.व्ही १० मिलेि. १० लिटर पाण्यातून फवारावे किंवा निंबोळी अर्क ४ टक्के फवारावे.

रोग

  1. भुरी : शेंगा वीतभर झाल्यावर पावसाळी, ढगाळ वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी माफाँलीन २५o मिलेि. किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ८o टक्के १२५o ग्रॅम किंवा डिनोकॅप ४० डब्लूपी ५ooग्रॅम प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रति हेक्टर २० किलो या प्रमाणात धुरळावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी किंवा धुरळणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.
  2. मर : या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा काबॅन्डेझीम ३ ते ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर ५ ते ६ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावे.

 

काढणी आणि उत्पादन

वाटणा शेंगाचा गडद हिरवा रंग फिकट रंगाच्या व टपोच्या दिसताच काढणीस सुरवात करावी व काढणीयोग्य शेंगा नियमित तोडाव्यात. काढणी ३ ते ४ तोड्यात पूर्ण होते. तोडणीचा हंगाम ३ ते ४ आठवडे चालतो. आठवड्यातून दोनदा तोडणी करणे सोईस्कर ठरते. लवकर येणा-या जातीचे हिरव्या शेंगाचे हेक्टरी उत्पादन २५ ते ३५ क्रॅिटल तर मध्यम कालावधी तयार होणा-या जातीचे उत्पादन ६५ ते ७५ क्रेिटलपर्यंत आणि उशिरा येणा-या जातीचे ८५ ते ११o क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *