मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून रेड अलर्ट

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून रेड अलर्ट 

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे

 

मुंबई : राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यापासून आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सूनचं वेळेत दाखल झाल्यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आणि दुकांनामध्ये पाणी शिरलं आहे. अशात आता मुंबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अधिक माहितीनुसार, मुंबईसह सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट यांसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात धुवांधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातही अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि नागपूरमध्ये मुसळधार पाऊस असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर तर गरज नसल्याच घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनचा प्रवास रेंगाळला आहे. राज्यात कोकण, गोवा, विदर्भात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे; पण शहरी भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होते आहे. मध्य महाराष्ट्रात बुधवारी महाबळेश्वरमध्ये ४५ मिलिमीटर, कोल्हापूरमध्ये १८, साताऱ्यात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

18 जूनला दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला ऑरेंज अ‌ॅलर्ट

पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार  

हे पण वाचा:- कृषी यंत्रावर मिळते ’50 टक्के सबसिडी’, कसा मिळवायचा लाभ- वाचा सविस्तर

सिंधुदुर्गातील तीन धरणे तुडुंब, नऊ धरणे 50 टक्के भरली

सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तीन धरणे तुडुंब भरली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाण्याचा संचय झाला आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात सरासरी 432 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, दुथडी भरून वाहत असताना तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात 100 टक्के पाण्याचा संचय झाला आहे. यात सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ,मालवण मधील धामापूर व कणकवली तालुक्यातील हरकूळ या लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. तर नऊ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 50 टक्क्याहुन जास्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन तीन दिवस पावसाचा जोर असाच राहिला तर सर्वच धरणे भरुन जातील, अशी शक्यता आहे.

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *