‘हवामान अंदाज’ मंगळवार पर्यंत राज्यात वाढणार पावसाचा जोर

हवामान अंदाज

‘हवामान अंदाज’ मंगळवार पर्यंत राज्यात वाढणार पावसाचा जोर

 

पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढील काही दिवस पूर्वमोसमी पावसासह उन्हाचा चटका चांगलाच वाढणार आहे. मंगळवारपर्यंत (ता.४) राज्याच्या काही भागांत वादळी वारे, गारपिटीसह पूर्वमोसमीच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला

सध्या राज्यातील भूपृष्टावरून उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळे सकाळपासून उन्हाचा कमालीचा चटका वाढत आहे. नऊ वाजल्यापासून पारा वाढत जाऊन दुपारी पारा सरासरी ओलांडत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. महाबळेश्‍वर येथे १९.९ अंश सेल्सिअसची किमान तापमान नोंदविले गेले.

हवामानासोबत वाचा शेती विषयी माहिती  ( ‘अद्रक लागवड ‘ )

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस ?

गुरुवार :- ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ

शुक्रवार :- पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ

शनिवार :- संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ

रविवार :-  संपूर्ण महाराष्ट्र

 

बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

 • मुंबई (सांताक्रूझ) ३४.६
 • अलिबाग ३६.१
 • रत्नागिरी ३३.८
 • डहाणू ३५.५
 • पुणे ३८.४
 • कोल्हापूर ३६.१
 • महाबळेश्‍वर ३१.३
 • मालेगाव ४२.२
 • नाशिक ३९.८
 • सांगली ३६.२
 • सातारा ३७.६
 • सोलापूर ३८.२
 • औरंगाबाद ४०
 • परभणी ४०.७
 • अकोला ४२.७
 • अमरावती ४२
 • बुलडाणा ४१.४
 • ब्रह्मपुरी ४३.७
 • चंद्रपूर ४२.६
 • गोंदिया ४१.४
 • नागपूर ४१.७
 • वर्धा ४२

संदर्भ :- www.agrowon.com

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व