शेतकरी वर्गाला पावसाचा जोराचा फटका, हवामानाचा अंदाज ठरला चुकीचा !

weather-forecast-turned-out-to-be-wrong

शेतकरी वर्गाला पावसाचा जोराचा फटका, हवामानाचा अंदाज ठरला चुकीचा !

 

हवामान खाते हे पावसाचा अंदाज व्यक्त करत असते. यावर्षी सुद्धा हवामान खात्याने जून महिन्यात सर्वाधिक पाऊस पडेल असा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळं शेतकरी वर्ग बिनदास्त झाला होता.

 

बदलत्या हवामानामुळे अंदाज ठरला फेल :

प्रत्येक वर्षी हवामान खात्याचा अंदाज हा पोकळ पनाचा ठरत आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा चांगलाच अडचणीत सापडला आहे. पावसाच्या अंदाजवर शेतकऱ्याला पेरणी करणं चांगलाच अडचणी सापडला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या सुरवातीला जोरदार आणि भरपुर मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडला. शेतकरी वर्गाने पावसानंतर पेरण्या सुद्धा योग्य पध्दतीने केल्या. परंतु पेरण्या करताच पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळं शेतकरी खूप चिंतेत आहे.

 

हे पण वाचा :-PM Kisan Yojana: केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये

 

महागाईच्या काळात शेतकरी वर्गाने मूग, घेवडा, सोयाबीन, उडीद, बाजरी ही महागडी बियाणी पेरली आहेत त्यामुळं न पडणाऱ्या पावसामुळं यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.आपल्याकडे मृग नक्षत्र मध्ये पावसाला सुरवात होते. यंदा च्या साली मृग नक्षत्र मध्ये पाऊस ही उत्तम आणि जोरदार पडला. गाढवाच्या नक्षत्रात पडलेला पाऊस कोल्ह्याच्या नावाच्या नक्षत्राप्रमाणे पडत नसल्याचा अंदाज शेतकरी वर्गाला येत आहे.

 

प्रत्येक वर्षी हवामान खाते पावसाचा अंदाज व्यक्त करतात. आणि शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या की हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन जाते. बऱ्याच वेळा हवामानाचा अंदाज हा चुकीचा ठरलेला आहे. याचा जोरदार फटका शेतकरी वर्गाला बसला आहे.या हवामानाच्या अंदाजामुळे शेतकर्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. या हवामानाच्या पोकळ अंदाजामुळे दुबार पेरणीची भीती ही शेतकरी वर्गाला लागली आहे.

संदर्भ :- marathi.krishijagran.com

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

2 thoughts on “शेतकरी वर्गाला पावसाचा जोराचा फटका, हवामानाचा अंदाज ठरला चुकीचा !”

  1. Harihar Pathode

    शेतकरी सुखी भवं 🌾 हरिहर पाथोडे शेतकरी

  2. Dayanand Hanamantrao Jagadale

    धन्य ते भारत देश्याचे हवामान खाते धन्य तो शेतकरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व