राज्यात पुढील ४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुढील ४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुढील ४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज

krushi kranti :- भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज जारी केला आहे.येत्या 48 तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागनं वर्तवली आहे. पावसाचा सर्वाधिक प्रभाव पुढील चार पाच दिवसात कोकणात राहणार आहे. मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुसळधार

राज्यातील पावसाची आजची स्थिती कशी ?

महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, लातूर नांदोड, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

5 सप्टेंबरला रत्नागिरीसह सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट :-

हवामान विभागानं उद्यासाठी 5 सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

6 सप्टेंबरला कोकणासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट :-

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

7 सप्टेंबरला बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट :-

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, औऱंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

कोकण मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा :-

कोकण आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता असून रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवण तंत्र 2021

Source:- tv9marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *