Weather Update : राज्यात आजपासून मुसळधार पाऊस !

Weather Update : राज्यात

Weather Update : राज्यात आजपासून मुसळधार पाऊस !

मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

हवामान विभागाचा अंदाज Meteorological Department Forecast

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तर विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार होईल. तसेच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांना दिलासा Farmer

महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जर पाऊस पुन्हा सक्रीय झाला तर शेतकऱ्यांना काही प्रमाणाता दिलासा मिळेल.

 

राज्यात कुठे कधी पाऊस ? Weather alert

  • 8 जुलै : पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी.
  • 9 जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
  • 10 जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस
  • 10 जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा.
  • 10 जुलै : पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता
  • 11 जुलै : मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस
  • 11 जुलै : विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

 

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व