Weather Update : पश्‍चिम महाराष्ट्र , कोकणात रेड अलर्ट

Weather Update : पश्‍चिम महाराष्ट्र , कोकणात रेड अलर्ट

Weather Update : पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात रेड अलर्ट

 

पुणे : मॉन्सूनच्या monsoon  सरीने राज्यातील बहुतांश भागात जोर धरला आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाचा rain जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातही बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना चार ते पाच दिवसांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट red alert जारी केला आहे.

 

गेल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ओढ दिली. तर गडचिरोली, चंद्रपूर वगळता उर्वरित विदर्भातही पाऊस नाही. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने भर पावसाळ्यात उन्हाळा अनुभवायला मिळाला. जळगावमध्ये तर कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला. मात्र दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पुन्हा हवेत गारवा तयार झाल्याने कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड येथे ३७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

 

पुढील दोन्ही आठवड्यांतील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केला आहे. यात पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या हजेरीनंतर कमाल तापमानात घट होणार आहे. अनेक भागांत किमान तापमान सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे.

 

मॉन्सूनची वाटचाल सुरू होणार

गेले अनेक दिवस उत्तर भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास मंदावला होता. मागील दोन दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाल्याने वाटचाल सुरू होणार आहे. आज (शनिवारी) दिल्लीसह, पंजाब हरियाना, राजस्थानच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली.

 

पुढील पंधरा दिवस सर्वदूर पावसाची शक्यता

येत्या दोन आठवड्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) राज्यात सर्वदूर पाऊस होणार आहे. पूर्व मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या आठवड्यातही (१६ ते २२ जुलै) जोर कायम राहणार असून, कोकणासह, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रमाण अधिक असेल. उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

येथे होणार जोरदार पाऊस

शनिवार:-  ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, वाशीम, यवतमाळ

रविवार:-  संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली

सोमवार:-  संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम

संदर्भ:- ऍग्रो वन

 

हे पण वाचा

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *