‘कांदा’ भाव वाढणार ? माघील वर्षा पेक्षा शेतकऱ्यांना मोठा दिलासा- वाचा सविस्तर

will-onion-prices-go-up-greater-relief-to-farmers-than-last-year

‘कांदा’ भाव वाढणार ? माघील वर्षा पेक्षा शेतकऱ्यांना मोठा दिलासा- वाचा सविस्तर

 

मुंबई : रब्बी हंगामातील कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालीय. सध्या कांद्याचे दर किरकोळ बाजारात २५ रुपये प्रति किलो सुरु आहेत. देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात सध्या कांद्याचे दर ११०० ते १५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेत. मागील वर्षी याच काळात कांद्याचे दर सरासरी ४०० ते ६०० रुपये क्विंटल इतके होते. कांद्याचं घटलेलं उत्पादन हेच यामागील कारण असल्याचं बोललं जातंय. कांद्याचे दर वाढले असले तरी अजूनही या दरात शेतकऱ्यांना फार नफा होत नसल्याचं दिसत आहे. सध्या कांदा उत्पादनाचा खर्च जवळपास १६ रुपये किलो आहे.

हे पण वाचा :-केंद्र सरकारचा मोठा निर्णय -निधी मंजूर

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोले यांनी यावर्षी अनियमित वीज, उशिरा लागवड, पाऊस आणि गारा यांच्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच कांदा दरात वाढ झाल्याचं दिसत आहे. दरवर्षी सरासरी १६ टन प्रति एकर प्रमाणे कांदा उत्पादन होतं. यंदा मात्र, प्रति एकर कांदा उत्पादन १० ते १३ टनापर्यंत घटलंय. त्यामुळे १६ रुपये प्रतिकिलो खर्च येत असताना ११ ते १५ रुपये प्रति किलो सरासरी दर शेतकऱ्यांसाठी कमीच मानला जातोय.

 

कांद्याचा उत्पादन खर्च किती ?

दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने २०१७ मध्ये कांदा उत्पादनासाठी प्रति किलो ९.३४ रुपये खर्च येत असल्याचं सांगितलं होतं. ४ वर्षांनी हा उत्पादन खर्च वाढून १५ ते १६ रुपये किलोपर्यंत वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आजही नुकसान होतंय. शेतकऱ्याला न त्याच्या मेहनतीचा पैसा मिळतोय, न जमिनीचा मोबदला मिळत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक शेती होते. नेमकं याच भागात यंदा कांदा उत्पादन घटलंय.

 

भारतात कांदा उत्पादन कुठे किती ?

  • महाराष्ट्र, तेलंगना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान हे राज्यं कांद्याचे मोठे उत्पादक राज्यं आहेत.
  • देशात कांद्याचं वार्षिक उत्पादन सरासरी २.२५ ते २.५० कोटी मेट्रिक टन इतकं आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा

संदर्भ :- tv9 marathi

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *