Search
Generic filters

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठताच खिलार बैलांची हजारांची किंमत गेली लाखोंवर 

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठताच खिलार बैलांची हजारांची किंमत गेली लाखोंवर 

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठताच खिलार बैलांची हजारांची किंमत गेली लाखोंवर 

 

कोरोना काळापासून जनावरांच्या बाजारात कमालीचा शुकशुकाट होता. मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झाल्याने अनेक ठिकाणचे आठवडी बाजार अद्यापही बंद आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी  न्यायालयाने शर्यतींना अटी-शर्ती परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा  खिलार बैलांना महत्व प्राप्त झाले आहे. शर्यतीचे शौकीन खिलार बैल खरेदीसाठी गडबड करु लागले आहेत. खरिपातील नुकसान अन् यंत्रावर आधारित शेती यामुळे ज्या बैलांना 20 ते 30 हजार सुद्धा कोणी द्यायला तयार नव्हते त्याच बैलांच्या किंमती आता लाखोंच्या घरात गेल्या आहेत. एका निर्णयाचा परिणाम काय होऊ शकते याचा अनुभव सध्या खिलार बैलाचे पालन करणारे शेतकरी घेत आहेत.

जातिवंत खिलार बैलाला सर्वाधिक मागणी

बैलगाडीच्या शर्यतीमध्ये खिलार बैलजोडीलाच अधिकचे महत्व आहे. त्याशिवाय ही शर्यत पारच पडू शकत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जातिवंत खिलार बैल आहेत त्यांच्याकडून 20 ते 30 हजार किमंत असलेल्या बैलांसाठी आता लाखो रुपये मोजण्याची तयारी ठेवली जात आहे. सर्वाधिक मागणी ही कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे. बैलगाड्यांची शर्यत हा खरा शौकिनांमुळे चर्चेतला विषय आहे. यातच कमी शेतकऱ्यांकडेच आता अशी जातिवंत बैल आहेत. त्यामुळे मागणी करणाऱ्यांची संख्या एका रात्रीत वाढली असून हे दर कुठपर्यंत जातात याचीच प्रतिक्षा आता विक्रेत्यांनाही असणार आहे.

हि बातमी पण वाचा:- आठवडाभराने सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सोयाबीनच्या दरामध्ये झाला बदल ? जाणून घ्या

लॅाकडाऊन पासून कमालीचा शुकशुकाट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जे लॅाकडाऊन करण्यात आले त्याचा परिणाम शेती व्यवसयावर कमी परंतू जनावरांच्या खरेदी-विक्रीवर अधिक झाला होता. आठवडी बाजार हे बंद असल्याने खरेदी-विक्री पूर्णपणे बंद होती. शिवाय आता शेती मशागत आणि इतर कामांसाठी यंत्राचाच वापर वाढला आहे. त्यामुळे जनावरांच्या विशेषत: बैलाचे बाजारांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला होता. त्या काळात मिळेल त्या किमतीमध्ये खिलार जनावरांची विक्री केली होती. शिवाय खिलार बैलांचे संगोपन हे तसे खर्चीक असल्याने विक्रीवरच भर दिला जात होता.

हि पण बातमी वाच:- Pik vima : विमा कंपन्यांचा मनमानी कारभारामुळेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम

ही तर सुरवात, दुपटीने दरवाढ होणार

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठून आता कुठे दोन दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. असे असतानाच बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. किंमतीचा विचार न करता केवळ खिलार जोड आहे का? एवढीच विचारणा केली जात आहे. अजून कुठे बैलगाडी शर्यंतीचे आयोजन झालेले नाही. मात्र, या शर्यतीला सुरवात होताच पुन्हा दुप्पट दराने खरेदी करण्याची तयारी ही शौकिनांची राहणार असल्याचे गोवंश पालक यांनी सांगितले आहे. ज्यांच्याकडे खिलार जनावरे आहेत त्यांच्याकडे शौकिनांनी चौकशीला सुरवात केली आहे. आता ही मागणी अशीच वाढत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *