शेती विषयक बातम्या- 26 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 26 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 26 ऑक्टोबर

 

विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनची आता काय अवस्था ?
हिंगोली जिल्ह्यातील एकंबा येथील शेतकऱ्याने केवळ 3 क्विंटल सोयाबीन आणले होते. यालाही सरासरीप्रमाणे दर मिळेल असा आशावाद होता, मात्र, जाहीर निलावात या सोयाबीनला तब्बल 11 हजार 21 असा दर मिळाला होता. मात्र, आज याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4 हजार 600 ते 4 हजार 800 दर मिळत आहे.

पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ
कांदा लागवड तशी लेंदी प्रक्रीया आहे. लागवडीच्या आगोदर दोन महिने रोपाची जोपासना त्यावर रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे लागवड होते की नाही हे अनिश्चित असते पण जर कांदा पेरलाच तर उत्पादन पदरात. आणि यामुळेच लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी नीलेश घोटेकर यांनी नवीन तंत्रानुसार एक एकर मध्ये लाल कांद्याची पेरणी केली आहे. शिवाय कांद्याचीच पेरणी नाही तर या पेरणी यंत्राने कोथिंबीर, मेथी, गाजर या पीकांचीही पेरणी करता येत असल्याने अनेक फायदे आहेत.

‘आयवीएफ’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्यांदाच म्हशीची गर्भधारणा, गोंडस पारडूला जम्न
तंत्रज्ञानाचा फायदा शेतीशी निगडीत बाबींना करण्याच्या दृष्टीनेदेखील सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. आता भारतात अशीच एक नवीन टेक्निक शास्त्रज्ञानी यशस्वीरित्या पशुसाठी विकसित केली आहे. या तंत्रपध्दतीचा जगात इतर ठिकाणी वापर झाला असला तरी भारतामध्ये आयवीएफ टेक्निकचा वापर करून पहिल्यांदाच म्हशीचे गर्भाधारण करण्यात आले आणि यशस्वीरित्या पारडूचा जन्म देखील झाला आहे.

खाद्यतेलाच्या दरावरुन पुन्हा केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, तेलबियांच्या साठ्यावर लक्ष केंद्रीत करा
गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात घट व्हावी याकरिता केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु, खाद्यतेलाचे दर हे आटोक्यात आलेले नाहीत. खाद्य तेलांच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी पुन्हा केंद्र सरकारने एकदा राज्यांना पत्र लिहले आहे. कारवाईबाबतचा आढावा घेण्यासाठी हे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावे
हरभरा व इतर पिकांच्या दहा वर्षावरील बियाण्याला शासकीय बियाणे पुरवठा संस्थांकडून अनुदान वितरित केले जात आहे. हे अनुदान दहा वर्षाआतील वाणांना देण्याचे शासकीय संस्थांना आदेश देण्याची मागणी वाशीममधील शेतकरी उत्पादक कंपनीने राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्तांकडे केली आहे.

शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन करावे : दादा भुसे
कृषी पदवीधरांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी सोमवारी (ता. २५) येथे केले.

पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवात
परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला असून, काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email