शेती विषयक बातम्या- 6 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 6 ऑक्टोबर

 

पुर्वहंगामी द्राक्ष बाजारात, सोयाबीनप्रमाणेच मिळतोय मुहुर्ताचा दर

पुर्वहंगामातील द्राक्ष हे बाजारात दाखल झाले आहेत. जून महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचा माल आता बाजारात दाखल होत आहे. ही द्राक्ष मुहुर्ताची असून नाशिक जिल्ह्यातील साटणा तालुक्यातील चैत्राम पवार यांच्या द्राक्षाला 130 रुपये किलोचा दर मिळालेला आहे.


साखर आयुक्तालयांच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल

नियम डावलून जर 15 ऑक्टोंबरच्या आगोदरच साखर कारखाना सुरु केला तर कारखान्याच्या संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय साखर आयुक्त यांनी घेतला असून त्यासंबंधी गृहखात्यालाही सुचित करण्यात आहे.


दावे झाले…पंचनामे झाले…नुकसानभरपाई मिळण्याची नेमकी प्रक्रिया काय ?

राज्यात पावसामुळे तब्बल 45 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादरही केला आहे. मात्र, यानंतरची प्रक्रीया काय आणि शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानभरपाईची रक्कम केव्हा पडणार हा खरा प्रश्न आहे. मात्र, यासाठी कोणती प्रक्रीया असते हे आपण पाहणार आहोत…


खाद्यतेलाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण पाऊल

पाम तेलाच्या आयातीवरचे शुल्क कमी करण्यासाठी ईशान्य भारत आणि अंदमान निकोबारमध्ये पाम तेलाची लागवड व प्रक्रिया करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘सबका साथ सबका विकास – सबका विश्वास- सबका प्रयास’ या तत्त्वाच्या आधारे देशाला पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वाखाली केला जात असल्याचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यानी सांगितले आहे.


लातूर बाजारभाव : सोयाबीनची काढणी होताच आवक वाढली, दर मात्र ‘जैंसे थे’

शेतामध्ये चिखल असताना देखील पावसाच्या धास्तीने सोयाबीन काढणी ही सुरुच आहे. या काढणीचा परिणाम मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाला. बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही 5 हजार क्विंटलवर गेली आहे. तर सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. भविष्यात वाढणारी आवक, सोयापेंडची आयात आणि साठवणुकीत अडचण यामुळे शेतकरी मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात आणत आहे.


नांदगावात सडलेली सोयाबीन, कपाशीची झाडं अधिकाऱ्याच्या टेबलावर ; संतप्त शेतकऱ्यांची तात्काळ नुकसानभरपाईची मागणी

यंदाच्या खरीप हंगामात जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा विदर्भ भागाला याचा मोठा फाटका बसला आहे. सोयाबीन, कापूस पिके शेतातच कुजली आहेत तर संत्रा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करीत येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी चक्क तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांच्या टेबलावर कुजलेली सोयाबीन आणि कपाशीची पिके ठेऊन आपला संताप व्यक्त केला आहे. तात्काळ नुकसानभरपाईची मागणी केली आहे.


सोयाबीन, उडदापाठोपाठ तूरीला पावसाचा फटका, उत्पादनात होणार घट

खरीप हंगामात सर्वात शेवटी तूरीची काढणी असते. त्यामुळे अधिकचा काळ शेतामध्ये असणाऱ्या या पीकावर (Heavy Rain) पावसाचा परिणाम होत नाही पण यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाडा आणि विदर्भात झाला आहे. त्यामुळे तूर ही पिवळी पडत आहे. देशाच्या तुलनेत तुरीचे निम्मे उत्पादन हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. या दोन राज्यातही पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे यंदा सोयाबीन, उडदाबरोबरच तुरीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email