शेती विषयक बातम्या- 7 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 7 ऑक्टोबर

 

साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात

साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.


विदर्भातील महामंडळाच्या गोदामात 24 लाख क्विंटल धान्य पडून, राज्य-केंद्राच्या वादात धान्याचे नुकसान

विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील शासकीय गोदामात तब्बल 24 लाख क्विंटल धान्य हे भरडण्याच्या प्रतिक्षेत पडून आहे. भरडण्यासाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली जाते. यंदा मात्र, केंद्र सरकारने मुदतवाढ देण्यास मनाई केली


सोयाबीनच्या काढणीला वेग ; दराचे भवितव्य अंधारात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

मराठवाड्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. मात्र, पावसाचे पाणी शेतात साचले असतानाही सबंध मराठवाड्यात सोयाबीन काढणी कामे वेगात सुरु आहेत. पावसाने तर पिकाचे नुकासान झाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनाबरोबरच दरावरही होणार आहे. एकरी 4 हजार रुपये खर्च करुन काढणी सुरु असलेल्या सोयाबीनच्या दराचे भवितव्य काय याचा अभ्यासही होणे गरजेचे आहे. यापुर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. भविष्यात दराला घेऊन अधिकचे नुकासान होऊ नये म्हणून कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे…


पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी

वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. तर आता या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाडा कोलम शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.


पाणीदार उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या वादळवाऱ्याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत.


पुणे कृषी उपन्न बाजार समितीत उडदाला 9200 रुपये कमाल भाव ; सोयाबीनसाठी मात्र प्रतीक्षाच

राज्यतल्या अनेक भागात पडणाऱ्या पावसाचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य एकूण बाजारावर झाला आहे. भाजीपाला दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या बाजारात वर्दळ पाहायला मिळते आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बाजारातही सोयाबीनचा दर 5000-6000 च्या दरम्यानच असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे उडीद पिकाला मात्र चांगला भाव मिळताना दिसत आहे. उडीदला 8400-9200 रुपये इतका भाव मिळाला आहे.


परतीचा पाऊस जोरदार …! राज्यात वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यातच राज्यात विजा मेघगर्जनेसह वळीव पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email