शेती विषयक बातम्या- 8 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 8 ऑक्टोबर

 

धक्कादायक! आता शेतकऱ्यांच्या गृहलक्ष्मीचीही आत्महत्या, मराठवाडा- विदर्भात शेतकरी महिला आत्महत्या कशा थांबणार?

औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात एका शेतकरी पत्नीने कर्ज, पिकांचे नुकसान आणि भविष्याची चिंता यापायी आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. ताराबाई कल्याण शेळके (40) असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.


पावसाचा परिणाम आगामी हंगामावरही, बीजोत्पादन घटणार, दर वाढणार

आगामी खरीप हंगामात पेरणीच्या दरम्यानच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब झालेले आहे. काही ठिकाणी तर जागेवरच सोयाबीनला कोंभ फुटलेले आहेत. त्यामुळे बीजोत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.


पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांचा ‘ढीग’, सर्व्हेक्षणात तक्रारी अपात्र

राज्यातून जवळपास 28 लाख शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केले आहेत. तर एकट्या परभणी जिल्ह्यात 4 हजार 743 पूर्वसूचना ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वसूचना दाखल झाली की विमा रक्कम पदरात पडणार असे नाही.


मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण

मोहरी पिकासाठी पोषक वातावरण तर आहेच शिवाय मोहरीच्या दरामध्ये सरकारने 400 रुपयांची वाढ केलेली आहे. त्यामुळे तंत्रशुध्द पध्दतीने लागवड आणि जोपासना केली तर यामधून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे.


सणासुदीच्या काळात झेंडू ,गुलाब, शेवंतीला चांगलीच डिमांड ; भाव झाले दुप्पट

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत त्यामुळे फुले, फळे यांना चांगली मागणी होत आहे. नवरात्र उत्सवास सुरुवात झाल्यामुळे फळांना या काळात चांगली मागणी असते. त्यामुळे फुले आणि फळ मार्केटला तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. फुलांच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.


दुष्काळात तेरावा : हमीभाव केंद्रच सुरु नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

हंगामातील पीकांची काढणी झाली असून बाजारात (Market) विक्रीही सुरु झाली आहे पण अद्यापही राज्यात ‘नाफेड’ ची खरेदी केंद्रच सुरु झालेली नाहीत. त्यामुळे नैसर्गिक संकटाबरोबर शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे.


जास्त पावसाने खरीप हंगामातील कांदा पीक झाले नष्ट,आवक प्रचंड प्रमाणात कमी होण्याची शक्यता

कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आलेल्या पावसाने कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर्षी नाशिक जिल्ह्यातील कांद्याची आवक फारच कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email