शेती विषयक बातम्या- 9 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 9 ऑक्टोबर

 

ऊसाची FRP एकरकमीच मिळणार, पिषुय गोयल यांचं सदाभाऊ खोतांना आश्वासन

राज्यामध्ये काही संघटना जाणीवपूर्वक केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. यावेळी पियुष गोयल यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणार नाही आणि तशाप्रकारचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही.


कधी थांबणार विजांचा थयथयाट? औरंगाबादेत 15 जनावरं दगावली, आकाशात गडगडाट अन् गावात भयाण शांतता

मराठवाड्यातील बहुतांश गावांतील सध्याचं चित्र पाहिलं तर दुपारनंतर आकाशात भयंकर गडगडाट पहायला मिळतोय, पण आपली माणसं, आपली जनावरं पोटाशी धरून हे संकट कधी दूर होईल, सरकारची मदत कधी पोहोचेल, या विचारानं गावा-गावांमध्ये भयाण शांतता पसरलेली दिसत आहे.


पाकिस्तानला दे धक्का ! भारतीय रताैल आंब्यालाच ‘जीआय टॅग’ प्रदान

वाराणसी येथील आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बागपत येथे वाढलेल्या रताउल आंब्याला ‘जीआय टॅग’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या वाणाला रताउल गावाच्या आधारे हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून करण्यात येणारा दावा अखेर खोडून निघाला आहे.


भात शेतीला धोक्याची घंटा, आवश्यकता योग्य रणनितीची

भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादन हाती पडेल असे नाही. यातच भविष्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे देशात भातशेती ही धोक्यात असून योग्य वेळा योग्य रणनिती करणे आवश्यक झाले आहे.


शेतकऱ्याला हमीभावाचा आधार, राज्यात मूग-उडदाच्या खरेदी केंद्राला परवानगी

अखेर हमीभाव केंद्राला हिरवा कंदील दाखवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. 15 ऑक्टोंबरपासून राज्यात ही केंद्र सुरु होणार आहेत. त्यामुळे मूग आणि उडदाला आधारभूत दर मिळणार आहे. 33 हजार टन मूग तर 38 हजार टन उडदाची खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आलेली आहे.


दोन वर्षांपासून रखडलेला पीक विमा मिळणार पुढच्या वर्षी, उच्च न्यायालयाचे आदेश

गतवर्षीच्या खरिपात नुकसान झालेल्या गेवराई तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांचे आक्षेप 31 जानेवारी 2022 पर्यंत निकाली काढून पात्र शेतकर्‍यांना पिक विमा वितरित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.


येत्या 3-4 दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

यावर्षी राज्यात पावसाचे चक्र हे असमान राहिले आहे. कधी कमी पाऊस तर कधी महापूर अशी अवस्था राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळली. दरम्यान येत्या ३-४ दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email