शेती विषयक बातम्या- 10 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 10 ऑक्टोबर

 

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान

फळ काढणीच्या दरम्यान फळगळतीचा धोका असतो. असे असतानाही ना पंचनामे केले जात आहेत ना सर्व्हेक्षण त्यामुळे अमरावतीसह राज्यातील फळबागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. (Vidarbha) बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा लागवड भागात ही फळगळती होत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.


‘पांढऱ्या’ सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार

राज्यात 85 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसानंतर बदलल्या परिस्थितीमुळे हे लक्ष्य कमी करुन 75 लाखावर आलेले आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. सध्या कापसाला 7000 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. तर हमीभाव हा 6025 ठरवून देण्यात आलेला आहे.


सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली

पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी- मळणी ही रखडलेली आहेत. पावसाचा परिणाम थेट सोयाबीनच्या आवकवर झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.


‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर

‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे. आता यामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ 5 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. वाढीव मुदतीचा शेतकऱ्यांनी चांगलाच फायदा घेतला असल्याचे दिसून येत आहे.


महसूल’च्या हलगर्जीपणामुळे पीकविम्यांच्या हरकती पडून

नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत महसूल विभागाचे अधिकारी हलगर्जीपणा दाखवीत असल्याचे उघड झाले आहे. कृषी आयुक्तालयाने याबाबत कडक शब्दांत राज्यातील सहा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.


पीकनुकसान नोंदीची खातरजमा करा

राज्यात सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होते आहे. मात्र शेतातील पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद योग्य पद्धतीने होते की नाही, याची खातरजमा स्वतः कृषी सहायकांनी करावी, असे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.


अतिवृष्टिग्रस्तांना हेक्टरी ४० हजारांची मदत द्या

परभणी : जिल्ह्यासह पेडगाव (ता. परभणी) मंडळातील अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीबद्दल ऑगस्ट २०१९मधील शासन निर्णयानुसार पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे हेक्टरी ४० हजार रुपये मदत द्यावी. खरीप पीककर्ज, वीजबिल माफ करण्यात यावे आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे शनिवारी पाथरी-परभणी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email