शेती विषयक बातम्या- 12 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 12 ऑक्टोबर

 

महसूलचा मनमानी कारभार, नुकसान सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे..!

नुकसान  भरपाईसाठी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. पण काही शेतकरी हे मदतीसाठी अपात्र ठरत असल्याचे प्रकार विशेष: मराठवाड्यात समोर आले आहेत. त्यामुळे यामागचे नेमके सत्य काय याची माहिती घेणेही तेवढेच आवश्यक आहे. कारण नुकसान होऊनही भरपाई मिळत नसेल तर शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे.


‘फळ तोडणी’ ऐवजी ‘बाग तोडण्याची’च शेतकऱ्यावर नामुष्की, लाखोंचे नुकसान

दोन दिवसांवर पपई या फळाची तोडणी होती पण या बागेतच पाणी साचल्याने पपई फळाची चवच गेली परिणामी फळ तोडणीच्या ऐवजी शेतकऱ्यावर फळबागेवरच कुऱ्हाड घालण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च पदरी पडलेला नाही.


15000 शेतकरी एकवटले अन् इतिहास घडला..

शेतकऱ्यांनी एकत्र आल्यावर काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. 15000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिनिंग फॅक्टरीच उभी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम तर मिळालेच आहे. पण अशा प्रकारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिनिंग फॅक्टरीसारखा प्रकल्प उभा राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.


वारे बहाद्दर ! 10 हजार सोयाबीनला भाव, तरच व्यापाऱ्यांना गावात ‘एंन्ट्री’

प्रतिकूल परस्थितीमध्येही एका गावाने असा निर्णय घेतला आहे की, जर सोयाबीनला 10 हजाराचा भाव दिला तरच सोयाबीनची विक्री होणार आहे. हा केवळ निर्णयच नाही तर गावच्या वेशीवर तसा फलकही लावण्यात येणार आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक केली तरी चालेल पण कमी दराने सोयाबीनची विक्री न करण्याचा निर्णय गावातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या गावचे नाव कुंभारगाव.


गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत ‘एफआरपी’ रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा ‘कडू’ टोला झाला ‘गोड’

आठवड्याभरात 23 साखर कारखान्यांनी तब्बल 125 कोटींची थकीत एफआऱपी रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे कारखान्यांचे गाळप सुरु करण्याबाबत आयुक्तालयाने घेतलेला निर्णय ऊस उत्पाकांसाठी गोड ठरला आहे.


24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!

नाशिकच्या शेतकऱ्याने 24 लाख खर्चून बांधलेलं पॉलिहाऊस नांगर लावून उध्वस्त करुन टाकलं. लॉकडाऊनमुळे फुलाला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याने पॉलिहाऊस नष्ट केलं.


कापसाचे दर राहतील ७००० रुपयांच्या पुढे: विजय जावंधिया

जागतिक बाजारात १९९४ व २०११ नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवली जात आहे. त्याच कारणामुळे यावर्षी भारतात कापसाचे दर ७००० रुपये प्रती क्‍विंटलपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तविली आहे

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email