शेती विषयक बातम्या- 11 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 16 ऑक्टोबर

शेती विषयक बातम्या- 11 ऑक्टोबर

 

ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

आजही राज्यातील शेतकरी हे बाजारपेठेचा विचार न करता पारंपारिक पध्दतीने फळ लागवड करतात. मात्र, त्यामुळे उत्पादन वाढले तरी उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आता ज्या फळांना ‘जीआय टॅग’ मिळाले आहे त्याच फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही 9 वाच हप्ता जमा झालेला आहे.त्यामुळे रखडलेला हप्ता जमा होणार की नाही, शेतकरी असलेल्या पती-पत्नी या दोघांनाही आता सन्मान निधीचा लाभ मिळणार अशा एक ना अनेक चर्चा ग्रामीण भागात होत आहेत. मात्र, यामागचे सत्य काय हे जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे…शिवाय कागदपत्रांची पूर्तता न केल्यानेही अनेकांच्या खात्यावर 9व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही


कुतूहल! शेतकरी उत्पादक कंपनीने सुरू केली जिनिंग फॅक्टरी,राज्यातील पहिलाच प्रोजेक्ट

नांदरखेडा ता. शहादा(नंदुरबार) येथे शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून वनश्री जिनिंग फॅक्टरी सुरुवात करण्यात आली आहे. एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनी ला असा प्रोजेक्ट देण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच वेळ आहे.


शेतमाल साखळीसाठी ‘ऑपरेशन ग्रीन’;1 कोटीपर्यंत अनुदान घेण्यासाठी राहिले फक्त पाच दिवस

कोरोना काळात विस्कळीत झालेल्या शेतमाल पुरवठा साखळीला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने वाहतूक आणि साठवणुकीसाठी ऑपरेशन ग्रीन अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला जास्तीत जास्त एक कोटींचे अनुदान मिळणार आहे. तर वाहतूक आणि साठवणुकीच्या खर्चाच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळेल.


आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

८ ते १४ ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीत पूर्व विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांशी भागांत सरीसरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


ई-पीक पाहणी अभियान सुसाट

राज्याच्या ई-पीक पाहणी अभियानात महसूल विभागाने मोठे यश प्राप्त केले आहे. आतापर्यंत या उपक्रमाशी ७७ लाख शेतकरी जुळले गेले आहेत.

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व